मांजर चावल्यावर लस घ्यावी लागते का?
मांजरीची नखं लागल्याने किंवा चावल्याने बॅक्टेरिया तुमच्या शरीरात पसरू शकतो. यासाठीच आज आपण जाणून घेणार आहोत मांजर चावल्यानंतर पहिल्यांदा काय करावं?
मुंबई : मांजरींशी खेळायला अनेकांना आवडतं. मात्र बरेचदा खेळताना मांजरींचे दात लागतात किंवा नखं लागतात. मांजरीचे दात किंवा नखं लागल्यास तुम्हाला संसर्ग होऊ शकतो. मांजर चावल्यानंतर आपण शक्य तितक्या लवकर डॉक्टरकडे जावं. मांजरीची नखं लागल्याने किंवा चावल्याने बॅक्टेरिया तुमच्या शरीरात पसरू शकतो. यासाठीच आज आपण जाणून घेणार आहोत मांजर चावल्यानंतर पहिल्यांदा काय करावं?
मांजर चावल्यावर काय करावं?
मांजर चावल्यानंतर तातडीने तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधावा. आणि तितक्या लवकर रुग्णालयात पोहोचावं.
अशा परिस्थितीत रूग्णालय तुमच्यापासून दूर असेल तर तुम्ही प्रथमोपचार करू शकता.
सर्व प्रथम, जखमेकडे पाहून ठरवा की जखम खूप खोल आहे की नाही. अशा परिस्थितीत, वैद्यकीय मदत घेणं आवश्यक आहे.
त्यानंतर तुम्ही जखमेला पाण्याने आणि साबणाने धुवून स्वच्छ करा. तुम्हाला जखमेवर हलका दाब द्यावा लागेल जेणेकरून रक्तासह बॅक्टेरिया बाहेर येतील.
बॅक्टेरियापासून वाचण्यासाठी तुम्हाला जखमेवर अँटीसेप्टिक औषध लावू शकता.
जखमेवर पट्टी लावा. तोपर्यंत तुम्ही डॉक्टरकडे जाऊन औषध किंवा उपचार घेऊ शकता.
या गोष्टींची काळजी घ्या
जेव्हा एखादी मांजर चावते तेव्हा आपण प्रथम मांजरीला जखमी व्यक्तीपासून दूर केलं पाहिजे
जखम साफ केल्यानंतर, तुमचे हात साबणाने आणि पाण्याने चांगले धुवा.
रक्त थांबवण्यासाठी, त्या भागावर हाताने दाब देताना हातमोजे घाला.
रक्तस्त्राव थांबल्यानंतरच जखम स्वच्छ करा
जखम गंभीर असो किंवा सामान्य, तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधा. जेणेकरुन डॉक्टरांना कळू शकेल की जखमेला टाके घालण्याची गरज आहे की नाही.
मांजर चावल्यानंतर लस घ्यावी लागते का?
जर मांजरीला रेबीज झाला असेल तर त्याच्या चाव्याव्दारे तुम्हाला रेबीज होऊ शकतो. हे टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे रेबीजचं इंजेक्शन किंवा लस घेणं. याशिवाय, मांजर चावल्यास तुम्हाला टिटॅनसचं इंजेक्शन देखील घ्यावं लागेल.