मुंंबई :  उन्हाळ्याच्या दिवसात दूध फाटणं, नासणं, खराब होणं ही समस्या हमखास घराघरात जाणवते. फाटलेलं दूध फेकून देणं अनेकींसाठी कठीण असतं. प्रत्येकालाच नासलेल्या दूधापासून बनवलेले पदार्थ आवडतीलच असे नाही. मग अशावेळेस नासलेल्या दूधावरचं पाणी तुमचं सौंदर्य खुलवण्यासाठी मदत करू शकतं हे तुम्हांला ठाऊक आहे का ? केसांपासून अगदी त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी फाटलेल्या दूधाच्या पाण्याचे हे आरोग्यदायी फायदे नक्की जाणून घ्या.   


 त्वचा खुलवण्यासाठी   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निस्तेज झालेल्या त्वचेला पुन्हा खुलवण्यासाठी फाटलेले दूध थंड करा. त्यावरील पाणी गाळून घ्या. या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. या पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचा मुलायम आणि टोन्ड होण्यासाठी मदत होते. फाटलेल्या दूधाच्या पाण्यात मायक्रोबायल गुणधर्म असतात. याचा वापर त्वचेची पीएच व्हॅल्यू सुधारण्यासाठी होऊ शकतो.  


कंडिशनर 


केसांना शाम्पू लावल्यापूर्वी फाटलेल्या दूधाच्या पाण्याने केस ओले करा. शाम्पूनंतरही कंडिशनरप्रमाणे हे पाणी वापरा. त्यानंतर दहा मिनिटांनी केस पुन्हा गरम पाण्याने स्वच्छ करा. या प्रयोगानंतर तुम्हांला केसांना विशेष कंडिशनर लावण्याची गरज नाही.  


ज्यूस अधिक पौष्टिक बनवतो  


फाटलेल्या दूधाचं पाणी  ज्यूसमध्ये मिसळल्याने त्यामधील पौष्टिकता वाढते. या पाण्याने शरीराला प्रोटीनचाही पुरवठा होतो. 


चपात्यांना मऊ करतात 


कणीक मळताना साध्या पाण्याऐवजी फाटलेल्या दूधाचं पाणी मिसळा. या पाण्याने कणीक मळल्यास चपात्या, फुलके नरम होण्यास मदत होते.   


 भाजीची ग्रेव्ही उत्तम 


भाजीच्या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी सुधारण्यासाठी साध्या पाण्याऐवजी फाटलेल्या दूधाचं पाणी मिसळा. या पाण्यामुळे भाजीला खास स्वाद मिळतो सोबतच त्याची ग्रेव्हीदेखील उत्तम जमून येते.  
थंड दूध पिण्याचे ८ जबरदस्त फायदे! जाणून घ्या आणि तुम्हीही नियमित दूध पिण्याची सवय लावून घ्या.