मुंबई : चॉकलेट केवळ जीभेचे चोचले पुरवण्यासाठी नाही तर त्वचेच्या आरोग्यासाठीही तितकेचं फायदेशीर आहे. त्वचा मुलायम करण्याची क्षमता डार्क चॉकलेटमध्ये आहे. त्वचेच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळवणयसाठी डार्क चॉकलेट फायदेशीर आहे. त्यामधील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक वाढत्या वयासोबत येणार्‍या समस्या आटोक्यात ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे खाण्यासोबतच चेहरा खुलवण्यासाठी डार्क चॉकलेट कसे मदत करते हे जाणून घेण्यासाठी हा सल्ला नक्की वाचा.


डार्क चॉकलेटचा त्वचेसाठी फायदा कसा ?   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चॉकलेटमध्ये दाह शामक गुणधर्म असल्याने चेहर्‍यातील शुष्कपणा कमी करण्यास मदत होते. संवेदनशील त्वचेसाठी चॉकलेट फायदेशीर आहे. यामुळे चेहर्‍याला चमक मिळते. सोबतच त्वचा मुलायम राहण्यास मदत होते. 


आजकाल अनेक फेशिएल्समध्ये चॉकलेटचा फ्लेवरही मिळतो. त्वचेवर डार्क  चॉकलेट लावल्याने अनेक समस्या कमी होतात. चेहर्‍यावरील अकाली सुरकुत्या येण्याचं प्रमाणही कमी होतं. 


1/3 कप कोको पावडरमध्ये 4 चमचे मध, लिंबाचा रस मिसळा. हा फेसपॅक चेहर्‍यावर आवा. 20 मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. या फेसपॅकमुळे चेहरा तुकतुकीत होण्यास मदत होते.