दातदुखीला झटपट दूर करेल `या` तेलाचे दोन थेंंब
दुखणं हे सहन करणं अत्यंत त्रासदायक असतं.
मुंबई : दुखणं हे सहन करणं अत्यंत त्रासदायक असतं. जेव्हा हे दुखणं दातांचं असतं तेव्हा त्रास अधिकच वाढतो. दातदुखी कमी करण्यासाठी अनेकजण पेनकिलर्सची मदत घेतात मात्र त्यापेक्षा काही नैसर्गिक उपाय अधिक फायदेशीर आणि सुरक्षित ठरतात. दातदुखी कमी करण्यासाठी लवंग चघळणं जितकं फायदेशीर ठरते त्याप्रमाणेच मोहरीचं तेलदेखील गुणकारी आहे. दातदुखी तो एक रामबाण उपाय आहे.
मोहरीच्या तेलामध्ये विटॅमिन्स, मिनरल्स, बीटा कॅरोटीन घटक मुबलक प्रमाणात आढळतात. यासोबतच कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न आणि फॅटी अॅसिड मुबलक असल्याने ते आरोग्यवर्धक आहे.
कशी कमी कराल दातदुखी?
दातदुखी कमी करण्यासाठी, पायरियाचा त्रास कमी करण्यासाठी मोहरीचं तेल फायदेशीर आहे. दुखणार्या भागावर तेलाचे थेंब कापसाच्या बोळ्याने लावणं फायदेशीर ठरतं. सोबतच मोहरीच्या तेलात मीठ मिसळून दात घासल्यानेही पायरियाचा त्रास कमी होतो. मोहरीच्या तेलाप्रमाणेच दातदुखीवर फायदेशीर ठरतील स्वयंपाकघरातील हे ४ पदार्थ!
मोहरीच्या तेलाचे जादूई फायदे -
मोहरीचे तेल दातदुखीप्रमाणेच कानदुखीवरही परिणामकारक ठरते. कानदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी तेलामध्ये लसणाची पाकळी मिसळून गरम केलेलं तेल थंड करून कानात थेंबभर टाकल्याने फायदा होतो.
प्रखर सूर्यकिरणांमुळे त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी मोहरीचं तेल लावणं त्वचेच्या आरोग्याच्यादृष्टीने फायदेशीर आहे.
त्वचेवर अतिप्रमाणात तेल लावू नका. यामुळे धूळ, धूर, प्रदूषण अशिक प्रमाणात खेचले जाण्याची शक्यता असते. बॉडी लोशनप्रमाणे काही थेंबभर तेल त्वचेवर लावावे.