मुंबई : महिला पीडित असलेल्या आपल्या नवऱ्याच्या वागणुकीमुळे हैराण झाली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे महिलेने आपलं दुःख संपूर्ण जगासमोर मांडल आहे. महिलेने पॅरेंटिंग फोरमला सांगितलं की, तिचा नवरा स्लीप डिसॉर्डरमुळे झोपेत चित्र विचित्र गोष्टी करतो. धक्कादायक बाब म्हणजे महिलेला सेक्स डॉलप्रमाणे वापरतो. महिला गेले १० वर्षे सगळ्या गोष्टी सहन करत आहे. 


प्रत्येक रात्री नाही तर कायमच असं होतं 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'डेली मेल'च्या बातमीनुसार, महिलेने पॅरेंटिंग फोरम बेबीसेंटरला सांगितले की, तिच्या झोपेत तिच्या पतीच्या विचित्र कृतींमुळे तिला त्रास होतो. तो रोज रात्री असे करत नसला तरी अनेकदा त्याचे हात माझ्या अंगावर असतात. जेव्हा मी माझे डोळे उघडते तेव्हा मी त्याला जोरात ढकलते.  ज्यामुळे त्याची झोप मोड होते आणि सर्वकाही तिथेच थांबते. महिलेच्या पतीला सेक्सोमोनियाचा त्रास आहे.


काय आहे सेक्सोमेनिया?


सेक्सोमेनिया हा झोपेचा विकार किंवा पॅरासोमनियाचा एक प्रकार आहे. जो एखाद्या व्यक्तीला झोपेच्या दरम्यान शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडतो. स्लीपिंग डिसऑर्डर पीडित पतीच्या कृतीचे वर्णन करताना ती महिला म्हणाली, 'अनेकदा झोपेतून उठल्यानंतर मी स्वतःला आक्षेपार्ह स्थितीत पाहते.


माझ्यासाठी हा मोठा मानसिक आघात आहे. मी माझ्या जोडीदाराला 10 वर्षांपासून ओळखते आणि त्याच्यावर विश्वास ठेवते. पण या सगळ्यानंतर मला आपला वापर झाल्यासारखं आणि असुरक्षित वाटतं. माझ्या वेदना शब्दात वर्णन करणे माझ्यासाठी खूप कठीण आहे.


नवऱ्याला हे सगळं लक्षात असतं का?


महिलेची समस्या ऐकल्यानंतर पॅरेंटिंग फोरमचे युजर्स तिला वेगवेगळे सल्ले देत आहेत. एका व्यक्तीने महिलेला रात्री बेडरूममध्ये न झोपण्याचा सल्ला दिला.  सांगितले की, यावेळी तिला स्वतःला वाचवण्याची गरज आहे. त्याचवेळी आणखी एका महिलेने विचारले आहे की, 'तिच्या नवऱ्याला हे सर्व आठवते का?


त्यावर पीडित महिला म्हणाली, माझ्या पतीला सेक्सोमॅनियाचे झटके येत होते, परंतु त्यांना ते कधीच आठवत नव्हते. जेव्हा आम्हाला याबद्दल कळले तेव्हा ते माझ्यासाठी खूप भीतीदायक होते. त्यामुळे मला बलात्कार झाल्यासारखे वाटले. 


पुढे पीडित महिला सांगते,'नाही, त्याला काहीच आठवत नाही. जेव्हा तो झोपेत पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो आणि मी नकार देते. तेव्हा त्याचे गैरवर्तन अधिक वाढते.