डोळा फडफडत असेल तर दुर्लक्ष करू नका, हे गंभीर कारण असू शकतं!
जाणून घेऊया आपला डोळा का फडफडतो आणि कोणत्या क्षणी आपण डॉक्टरांकडे गेलं पाहिजे.
मुंबई : आपल्या शारीरिक अवयवांमध्ये होणाऱ्या छोट्या छोट्या अॅक्टिव्हिटी अंधश्रद्धेशी जोडल्या जातात. असाच एक अवयव म्हणजे डोळा. या समजुतींमध्ये उजवा डोळा फडफडणं शुभ मानलं जातं. तर डावा डोळा फडफडणं अशुभ मानलं जातं. मात्र कधी तुम्ही यामागील खरं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? तर आज जाणून घेऊया आपला डोळा का फडफडतो आणि कोणत्या क्षणी आपण डॉक्टरांकडे गेलं पाहिजे.
पापण्यांच्या स्नायूंमध्ये तणाव निर्माण झाल्यामुळे डोळा मिटतो. ही अगदी किरकोळ गोष्ट आहे आणि सामान्यत: त्याचा परिणाम एखाद्या व्यक्तीच्या वरच्या पापण्यावरच दिसून येतो. दरम्यान हे खालच्या आणि वरच्या दोन्ही पापण्यांमध्ये होऊ शकते. वैद्यकीय भाषेत या तीन भिन्न कंडीशन असतात- मायोकेमिया, ब्लेफेरोस्पाज्म आणि हेमीफेशियल स्पाज्म.
मायोकेमिया
डोळे फडफडण्याचं हे सर्वात सामान्य कारण आहे. जे आपल्या जीवनशैलीशी संबंधित आहे. मायोकेमिया स्नायूंच्या सामान्य संकुचिततेमुळे होतो. डोळ्याच्या खालच्या पापण्यावर याचा जास्त परिणाम होतो. हे अगदी थोड्या काळासाठी होते आणि जीवनशैलीतील बदलांद्वारे नियंत्रित केलं जाऊ शकतं.
ब्लेफेरोस्पाज्म आणि हेमीफेशियल स्पाज्म
ब्लेफेरोस्पाज्म आणि हेमीफेशियल स्पाज्म दोन्ही गंभीर वैद्यकीय कंडीशन्स आहेत. जी अनुवांशिक कारणांमुळे होते. या अवस्थेत, रुग्णाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागू शकतो.
डोळे फडफडण्याचं खरं कारण
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मेंदूत किंवा नर्व डिसॉर्डरमुळे एखाद्याचा डोळा फडफडू शकतो. यात बॅन पल्सी, डायस्टोनिया, सर्विकल डायस्टोनिया, मल्टीपल सेलोरोसिस आणि पार्किन्सनसारखे विकार समाविष्ट आहेत. तर जीवनशैलीतील काही त्रुटींमुळे लोकांनाही अशा समस्या येऊ शकतात.
डोळे फडफडण्याची इतर कारणं
ताण
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, ताणतणावामुळेही लोकांना डोळा फडफडण्याची तक्रार उद्भवू शकते. त्यामुळे ताणतणाव कमी होईल अशा गोष्टींवर भर द्यावा
आय स्ट्रेन
जर तुम्ही पूर्ण दिवस लॅपटॉप, टीव्ही किंवा मोबाईलच्या स्क्रिनसमोर असाल तर आय स्ट्रेनची समस्या उद्भवू शकते. अशावेळी ड़ोळ्यांना आराम देणं गरजेचं आहे.
अपुरी झोप
डोळा फडफडण्यामागे अपुरी झोप हे देखील एक कारण असू शकतं. डॉक्टर म्हणण्याप्रमाणे, व्यक्तीने कमीत कमी 7-9 तासांची झोप घेतली पाहिजे.