मुंबई : साइनसाइटस किंवा सायनसचं दुखणं अनेकदा असहनीय असतं. सायनसमध्ये (Sinus) जराशीही सर्दी, खोकला, ताप मोठी समस्या बनते. सायनसचे अनेक रुग्ण सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, सूज येणं अशा दुखण्याने त्रस्त असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अॅलर्जी किंवा थंडीमुळे सायनसमध्ये सूज येते आणि यामुळे रुग्णाला डोकेदुखी, शरीराच्या अनेक भागात अतिशय वेदना होतात. या दुखण्यापासून सुटका होण्यासाठी अनेक रुग्ण काही औषधंही घेतात. पण काही घरगुती उपायांनी सायनसच्या दुखण्यापासून काहीसा आराम मिळू शकतो. 


सलायन सोल्यूशन स्टीम


सायनसच्या समस्येवर मिठाच्या पाण्याची वाफ घेणं फायदेशीर ठरतं. यामुळे बंद नाक मोकळं होते आणि सायनसच्या दुखण्यापासूनही काही प्रमाणात आराम पडतो. दिवसांतून दोन ते तीन वेळा हा उपाय करता येऊ शकतो.


हायड्रेटेड राहा


सायनसच्या समस्येपासून बचाव करण्यासाठी स्वत:ला हायड्रेटेड ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी वेळोवेळी गरम पाणी, फळांचे ज्यूस, नारळ पाण्याचं सेवन करावं. त्यामुळे शरीर डिहायड्रेटेड होण्यापासून बचाव होईल. शरीर हायड्रेटेड राहिल्यास सायनसची समस्याही कमी होण्यास मदत होईल.


तणावमुक्त राहा


सायनसची समस्या असल्यास कोणत्याही परिस्थितीत अधिक ताण घेऊ नका. मानसिकदृष्ट्या स्वस्थ राहण्याचा प्रयत्न करा. डिप्रेशनची समस्या असल्यास मानोसोपचार तज्ञांचा सल्ला घ्या. सोबतचं योगा करणं फायदेशीर ठरेल. यामुळे मानसिक शांती मिळाल्यास सायनसची समस्याही दूर होण्यास मदत होईल.


अॅप्पल साइड व्हिनेगर


अॅप्पल साइड व्हिनेगर सायनसवर फायदेशीर ठरतं. अॅप्पल साइड व्हिनेगर इन्फेक्शनपासून बचाव करतं. सायनसची समस्या उद्भवल्यास, २ चमचे अॅप्पल साइड व्हिनेगरमध्ये १ चमचा मध मिसळून पिण्याने सायनसपासून बचाव होतो.


हळद 


हळदीनेही सायनसमध्ये आराम पडतो. हळदीत पुरेशा प्रमाणात अॅन्टी-इंफ्लेमेटरी गुण असतात. त्यामुळे सायनस इन्फेक्शन कमी होतं. खाण्यापासून ते गरम पाण्यातूनही हळद टाकून घेतल्यास फायदा होतो.