Effects of not having sex : सेक्स करणे ही एक सामान्य गोष्ट आहे. मात्र आजंही आपल्या समाजात सेक्स हा शब्दाबाबत टॅबू आहे. लोकांच्या मनामध्ये सेक्सबाबत ( Sex ) मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत माहिती व्हावी म्हणून सेक्स एज्युकेशन ( Sex Education ) सारख्या गोष्टी आता पुढे येऊ लागल्या आहेत. जेणेकरून याबाबत समाजामध्ये जनजागृती होण्यास मदत होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शारीरिक संबंध ठेवणं हे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. या उलट सेक्स न केल्याने शारीरिक आणि मानसिक ( Physical And Mental Health ) रूपात बदल होत असल्याचं, संशोधनातून समोर आलं आहे. चला आज जाणून घेऊया सेक्स न केल्याने लोकांच्या शरीरावर कोण कोणते प्रभाव दिसून येतात.


नातेसंबंधांवर होऊ लागतो परिणाम


सेक्स ( Sex ) करण्याचा एक मुख्य कारण म्हणजे कपलमधील नातं मजबूत राहतं. नियमित पद्धतीने सेक्स केल्याने जोडप्यांमध्ये असलेलं प्रेमाचं नातं चांगलं राहतं. एका संशोधनानुसार, सामान्यतः, जे पार्टनर्स जास्त लैंगिक संबंध ठेवतात ते कमी सेक्स करणाऱ्यांपेक्षा अधिक भावनिकरित्या जोडलेले असतात. या उलट दीर्घकाळ सेक्स न केल्यास जोडीदारासोबतचे नातं अधिक ताणले जातं. 


शरीरातील इम्युनिटीवर होतो परिणाम


जर तुम्ही शारीरिक संबंध दीर्घकाळ ठेवले नाही तर त्याचा तुमच्या प्रतिकारशक्तीवरही परिणाम होऊ शकतो. जर तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत असेल तर तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहता. तुम्ही दीर्घकाळ कोणाशीही शारीरिक संबंध ठेवले नाहीत तर त्याचा तुमच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होऊ शकतो. यामुळे तुम्ही लवकर आजारी पडू शकता. काही अभ्यासातून असं दिसून आलंय की, जेव्हा लोक शारीरिक संबंध ठेवतात तेव्हा शरीरातील इम्युनोग्लोबिनचे रसायन सतत वाढते. 


तणावात होते वाढ


नियमित पद्धतीने सेक्स केल्याने शरीरात एंडोर्फिन आणि ऑक्सीटोसिन हार्मोन स्रवले जातात. हे न्यूरोकेमिकल्स तणावाचे परिणाम व्यवस्थापित करण्यात मदत करतात. तुम्ही नियमितपणे सेक्स करत नसल्यास, तुमचे शरीर हे हार्मोन्स कमी वेळा स्रवलं जातं. ज्यामुळे तणावाचा सामना करणं अधिक कठीण होऊ शकतं. परिणामी तुमच्या ताणतणावामध्ये वाढ होण्याची शक्यता असते.


त्वचेवर पडतो गंभीर परिणाम


जर तुम्ही शारीरिक संबंध ठेवत नसाल तर त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवरही दिसून येण्याची शक्यता असल्याचं, एक संशोधनातून समोर आलं आहे. मात्र याऊलट सतत शारीरिक संबंध ठेवल्यास तुमची त्वचाही चमकदार होऊ शकते. सेक्स केल्यानंतर शरीरात डोपामाइन हार्मोन वाढतो आणि त्यामुळे आपली त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनते. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)