मुंबई : चहा हे भारतीय लोकांच्या आवडत्या पेयांपैकी एक आहे. आपल्यापैकी असे बरेच लोक असतील की, सकाळच्या चहाशिवाय त्यांचा एक दिवस देखील जात नाही. ऐवढेच काय तर तुम्ही असे देखील चहा प्रेमी पाहिले असेल ज्यांना काही वेळाच्या फरकाने चहा घेण्याची सवय असते. ते चहासाठी इतके वेडे असतात की, त्यांना वेळेवर चहा मिळाली नाही तर चालत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का की, पुन्हा पुन्हा चहा पिण्याची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवसातून 2 कप चहा पिणे ही वाईट सवय नाही, परंतु यापेक्षा जास्त चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.


अशा परिस्थितीत तुम्हाला देखील अशी सवय असेल, तर तुम्ही ती आजच सोडली पाहिजे. आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगत आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही आज ही सवय सोडू शकता.


चला तर जाणून घेऊ या चहा पिण्याचे तोटे


पोटासाठी हानिकारक


जास्त चहा प्यायल्याने पोटाचा त्रास होऊ शकतो. यामुळे तुमची पचनक्रिया बिघडते. जास्त चहा प्यायल्याने पोटात गॅस, पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. म्हणून आजच ही सवय सोडा.


छातीत जळजळ


बर्‍याच लोकांना छातीत जळजळ, पोटात गॅस, अपचन आणि आंबट ढेकर यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. असे घडते कारण तुम्ही जास्त चहा पितात. त्यामुळे तुमच्या पचनाला जास्त नुकसान होते.


जास्त चहा पिण्याची सवय कमी करण्याचे उपाय


1- चहाचे अतिसेवन टाळण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे जेव्हा तुम्हाला चहा प्यावासा वाटतो, तेव्हा त्याऐवजी काहीतरी आरोग्यदायी प्या. तुम्ही चहा ऐवजी ज्यूस पिऊ शकता.


२- एकदाच सोडण्याचा प्रयत्न करू नका, ते तुमच्यासाठी हानिकारक ठरु शकतं. चहा हळूहळू सोडण्यासाठी तुम्ही एक-एक कप चहा कमी करत राहा.


३- चहाचे सेवन कमी करण्यासाठी दिवसभर जास्त प्रमाणात द्रवपदार्थांचे सेवन करावे. यामुळे तुमच्या शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि तुमची चहाची तल्लफ कमी होते.


४- दिवसभर पुरेशी आणि चांगली झोप घ्या झोपेशी तडजोड करू नका. या प्रकरणात, आपल्याला चहा पिण्याची गरज भासणार नाही.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)