मुंबई : सध्याच्या धकाधकीच्या जिवनात लोकांना कामाचा भरपूर ताण असतो, त्यात लोकं मोबाईलचा वारंवार वापर करताता, ज्यामुळे कमी झोप, डोळ्यांवरती ताण यासारख्या गोष्टीमुळे लोकांमध्ये डोकेदुखीचे प्रमाण सध्या वाढले आहे. जर ही डोकेदुखी किरकोळ असेल, तर घरात असलेले मलम वापरल्याने आपल्या आराम मिळतो. पण कधीकधी अशी तीव्र डोकेदुखीची सुरूवात होते की, लोकांना काहीही सुचत नाही. लोकांना अशा डोकेदुखीने जाणवते की, आताच त्याचे डोके फुटेल, इतक्या त्या वेदना असहाय होतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यावेळी असे वाटते की, असे कोणते तरी औषध असावे, जे आपल्याला त्वरित आराम देतील. पण अनेक डॉक्टर असेही सांगतात की, डोकेदुखीमध्ये लगेच औषध घेऊ नये. कारण अशा परिस्थितीत पेनकिलर घेतल्याने इतर समस्या निर्माण होऊ शकतात.


डोकेदुखीमध्ये औषधांशिवाय त्वरित आराम देणारे अनेक उपाय तुम्ही करु शकता. तुम्हाला फक्त याची माहिती असायला हवी. डोकेदुखीचे अनेक घरगुती उपचार आयुर्वेदातही सांगितले गेले आहेत. याबाबत आम्ही आयुर्वेद डॉक्टरांनी 4-5 सोपे उपाय सांगितले आहे जे उपाय तुम्ही घरी वापरुन पाहू शकता.


1. लवंग त्वरित आराम देईल


कधीकधी बाम किंवा मलम लावून देखील डोकेदुखी दूर होत नाही. अशा परिस्थितीत लवंग तुम्हाला त्वरित आराम देऊ शकते. यासाठी तुम्हाला लवंगची पोटली तयार करावी लागेल, ती तयार करण्यासाठी तुम्हाला फक्त 4 ते 6 लवंगा एकत्र घ्याव्या लागतील. त्या एका तव्यावर गरम करा. जास्त भाजू नका, फक्त चांगले गरम करा. आता त्याची बारीक पूड तयार करा. ही पावडर रुमालात बांधून त्याची पोटली बनवा. आता या पोटलीचा इनहेलरसारखा वास घ्या. लवंगाच्या सुगंधामुळे तुमची डोकेदुखी दूर करण्यास मदत मिळेल.


2. पुदीन्याची पाने


डोकेदुखी कमी करणाऱ्या बाममधील घटक जर तुम्ही पाहिलेत, तर त्यामध्ये पुदीनाचे नाव तुम्हाला पाहायला मिळेलच. सरळ पुदिन्याची पाने खाल्याने देखील तुम्हाला आराम मिळू शकतो. नाहीतर काही पुदिन्याची पाने घ्या आणि त्याचा रस काढा आणि तुमच्या कपाळावर लावा. यामुळे तुम्हाला काही मिनिटांत आराम मिळेल. आपण पुदीना चहामध्ये देखील टाकून घेऊ शकता.


3. तुळशी हा देखील एक प्रभावी उपाय आहे


डोकेदुखीसाठी तुळशीची पाने हा एक महत्त्वाचा नैसर्गिक उपाय आहे. तुळस ही ताणलेले स्नायू शांत करण्यास मदत करते. एक वाटी पाण्यात तुळशीची काही पाने टाकून उकळू द्या. आता हा काढा हळू हळू प्या. आपण इच्छित असल्यास, आपण त्यात थोडे मध देखील घालू शकता.


4.  आलं आराम देईल


डोकेदुखी दूर करण्यासाठी आल्यांची महत्वाची भूमिका आहे. ते खाले तसेच लावले देखील जाऊ शकते. एक चमचा आलं पावडर घ्या आणि दोन चमचे पाणी मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट कपाळावर काही मिनिटे ठेवा. हे डोकेदुखीच्या औषधासारखे कार्य करेल आणि आराम देईल.


5. आल्याची वाफ घेतल्याने आराम मिळेल


आले पावडर किंवा कच्चे आले पाण्यात उकळा. आता या पाण्याची वाफ घ्या. काही काळ असे केल्याने तुम्हाला डोकेदुखीमधून आराम मिळू शकतो. बऱ्याच लोकांना आल्याच्या चहामुळे डोकेदुखीमध्ये देखील आराम मिळतो.