... म्हणून पालथे किंवा पोटावर झोपण्याची सवय टाळा
दिवसभर काम करून थकल्यानंतर घरी गेल्यावर अनेकजण थेट बेडवर आडवे होतात तहान, भूक विसरून, कपडे बदलण्याची तसदी न घेता अनेकजण थेट बेडवर आडवे पडतात.
मुंबई : दिवसभर काम करून थकल्यानंतर घरी गेल्यावर अनेकजण थेट बेडवर आडवे होतात तहान, भूक विसरून, कपडे बदलण्याची तसदी न घेता अनेकजण थेट बेडवर आडवे पडतात. असं केल्याने तुम्हांला थोडं रिफ्रेशिंग वाटत असलं तरीही पालथं किंवा थेट पोटावर झोपत असाल तर हा सल्ला नक्की जाणून घ्या.
पोटावर झोपणं आरोग्याला त्रासदायक
निरोगी आरोग्यासाठी प्रत्येकाला किमान 8 तासाची झोप आवश्यक आहे. मात्र रात्रीच्या वेळेस तुम्ही कोणत्या स्थितीमध्ये झोपता हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.
जेवणानंतर किमान 2-3 तासानंतर झोपावे. अन्यथा पचनक्रियेमध्ये बिघाड होऊ शकतो. झोपताना थेट पोटावर झोपण्याऐवजी एका कुशीवर झोपावे. आरोग्यशास्त्राच्या दृष्टीने डाव्या कुशीवर झोपणं फायदेशीर ठरते.
पोटावर झोपण्याचे दुष्परिणाम
तज्ञांच्या माहितीनुसार, पोटावर झोपणं हे आरोग्याला अत्यंत त्रासदायक ठरू शकते.
पोटावर झोपल्याने मणक्याला त्रास होऊ शकतो. सोबतच छातीवरही ताण येतो. पोटावर झोपण्याची सवय असेल तर नियमित या स्थितीत झोपल्याने मणक्याला कर्व्ह येतो. परिणामी मणक्याचे आजार वाढतात. मणक्याप्रमाणेच मानेलादेखील त्रास होऊ शकतो. पोटावर झोपताना मान एका बाजूला वळवली जाते यामुळे मानेचे दुखणे, आखडणे असा त्रास होऊ शकतो.
कोणत्या स्थितीमध्ये झोपावे ?
पोटावर झोपल्याने होणारा त्रास टाळण्यासाठी पाठीवर किंवा कुशीवर झोपण्याची सवय लावा. हळूहळू तुम्हांला एका कुशीवर झोपण्याची सवय होईल.
पोटावर झोपणार असाल पोटाखाली उशी असावी. पण या स्थितीत झोपणं शक्य नसतं. त्यामुळे काही कारणास्तव तुम्हांला पोटावर झोपणं अपरिहार्य असेल तर पोटाखाली उशीऐवजी इतर काही गोष्टींचा आधार नक्की घ्या.