मुंबई : उत्तम आरोग्यासाठी आहार, व्यायाम यासोबतच शांत झोप गरजेची असते हे तुम्हांला ठाऊक आहे. रात्रीच्या वेळेस शांत आणि किमान 8 तासांची झोप आवश्यक आहे. मात्र सुट्टीच्या दिवसांमध्ये अति झोपण्याची सवय तुम्हांला असेल तर त्यामुळे नुकसान होते हे तुम्हांला ठाऊक आहे का ?  
 
 कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो, मग त्याला 'झोप' कशी अपवाद ठरेल? अति झोपेमुळेही आरोग्याचं नुकसान होते. काही संशोधनामधून अति झोपेचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम समोर आले आहेत. 


अति झोपेचे काय होतात दुष्परिणाम? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लैंकास्टर युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार, दिवसभरात  1 तास 45 मिनिटांच्या झोपेमुळे तुम्हांला काही अनुभवांचा विसर पडू शकतो. झोपल्याने आठवणी अधिक चांगल्याप्रमाणे मेंदूमध्ये साठवल्या जातात. मात्र डोक्यातील उजव्या भागामध्ये साठवलेले अनुभव हळूहळू कमी होतात. 
झोपल्यामुळे दिवसभर आपण मेंदूला दिलेल्या सार्‍या सूचनांमधून त्याची सुटका होते. आपल्या डोक्यातून कमी महत्त्वाच्या गोष्टी हळूहळू दूर जातात. परिणामी आपण नव्या अनुभवांसाठी जागा बनवत असतो. 


काही शास्त्रज्ञांच्या मते मात्र याचा उलट परिणाम होतो. दिवसा झोपल्याने मेंदूवर उलट परिणाम होतो. यामुळे अनुभवांशी निगडीत आठवणी आपण विसरतो. आपल्या वास्तविक जीवनात नसलेल्याही काही गोष्टी आपल्या डोक्यात शिरकाव करतात. यामुळे आपल्या मनात भीती निर्माण होते. 
 
 केवळ दिवसा नव्हे तर रात्रीची झोपही अतिप्रमाणात घेतल्यास त्याचा मेंदूवर परिणाम होतो. मेंदूमध्ये आठवणींचा कप्पा बदलत असला तरीही त्यासोबत  भीतीदेखील वाढण्याची शक्यता असते. 
 
 मेंदूच्या डाव्या भागापेक्षा उजव्या भागात आठवणी अधिक प्रमाणात राहतात. दिवसा झोपल्याने मेंदूचा उजवा भाग अधिक प्रभावित होतो. त्यामुळेच या भागात असलेल्या आठवणींवरही परिणाम होतो.