PHOTO: ... म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी कान्होजी आंग्रे यांना 'सरखेल' पदवी बहाल केली

Kanhoji Angre: आजच्या दिवशीच म्हणजेच 4 जुलै रोजी 295 वर्षांपूर्वी कान्होजी यांना गनिमांशी लढताना वीरमरण आले. 'ज्याचा आरमार त्याचा समुद्र', 'ज्याची सागरी तटबंदी भक्कम त्याचं राज्य भक्कम' छत्रपती शिवरायांनी हे आधीच जाणलं होतं.  त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मराठा आरमारसाठी अमुलाग्र योगदान दिलं होतं. 

Jul 04, 2024, 16:55 PM IST
1/10

'ज्याचा आरमार त्याचा समुद्र', 'ज्याची सागरी तटबंदी भक्कम त्याचं राज्य भक्कम' छत्रपती शिवरायांनी हे आधीच जाणलं होतं.  स्वराज्य वाढवण्यासाठी आणि रयतेला गनिमांपासून संरक्षण द्यायचं असेल तर फक्त गड किल्लेच नाही तर सागरी सीमांवरही आपलं राज्य असणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच महाराजांनी स्वराज्याच्या आरमाराची स्थापना केली.

2/10

हिंदवी स्वराज्याच्या आरमाराच्या कार्यात सरखेल कान्होजी आंग्रे यांचा मोलाचा वाटा आहे. कोकणातला जन्म असल्याने समुद्राशी खेळणं त्यांच्या रक्तातच होतं. 

3/10

'मायनाक भंडारी' यांच्या उत्तरार्धात सरखेल कान्होजी आंग्रे यांनी हिंदवी स्वराज्याच्या आरमारासाठी जीवावर उदार होऊन शौर्य गाजवलं. 

4/10

छत्रपती शिवरायांच्या काळात नौदल प्रमुखाला सरखेल ही पदवी बहाल करण्यात येत होती. 

5/10

'सरखेल कान्होजी आंग्रे' यांनी 1702 साली कोचीनमध्ये सहा इंग्रजांसह त्यांच्या जहाजांवर ताबा मिळवला होता. 

6/10

1710 मध्ये  ब्रिटिश सैन्याशी दोन दिवस युद्ध केल्यानंतर खांदेरीवर मराठ्यांनी विजय मिळवला. 

7/10

 मुंबईचा 'ब्रिटिश गव्हर्नर विल्यम ऐस्लाबी' यांच्या जहाजाला मराठ्यांनी ओलीस ठेवलं. या गव्हर्नरकडून त्यांनी 30 हजार रुपयांची लुट गोळा केली होती. 

8/10

ब्रिटीशांनी बळकवलेले 10 किल्ले त्यांनी 1713 च्या युद्धानंतर मराठा साम्राज्यात पुन्हा आणले होते. 

9/10

1718 मध्ये मुंबईच्या बंदरावर मराठ्यांनी नाकेबंदी करुन येणाऱ्या जाणाऱ्या परकीय व्यापारी जहाजांकडून कर वसुली करण्यात आली होती. 

10/10

अलिबागमध्ये त्यांचे वंशज विजयादशमीच्या दिवशी कान्होजी आंग्रेच्या शिवकालीन शस्त्रांची पुजा करतात.