मुंबई : प्रत्येकाचा दिवस सकाळी सुरू होतो. पण ही सकाळ सुप्रभात करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. आपल्यात चांगल्या सवयी आणल्या पाहिजेत ज्यामुळे त्याचा दिवसभर आनंद घेऊ शकाल.



मॉर्निंगला 'गुड मॉर्निंग' बनवण्यासाठी उपयुक्त टिप्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. सकाळी उठल्यानंतर नित्यकर्म झाले की, हलका व्यायाम करावा. यामुळे शरीरात रक्ताभिसरण सुधारते आणि मेंदूमध्ये एंडॉर्फिन संप्रेरक सोडल्यामुळे तणाव कमी करते. ज्यामुळे आपल्याला दिवसभर सकारात्मक वाटेल.


2. सकाळी उठण्यासाठी देखील रात्री लवकर झोपायला पाहिजे. कारण रात्री उशिरा झोपल्याने पुढच्या सकाळी लवकर उठण्याची आणि पुरेशी झोप होण्याची शक्यता कमी होते.


3. सकाळी संगीत ऐकणे खूप फायदेशीर आहे. हे केवळ आपला मूड सुधारत नाही तर त्यासह थोडं थिरकल्यामुळे आपला व्यायाम देखील होतो.


4. जर शरीर आणि मन दिवसभर योग्य प्रकारे कार्य करण्यास सक्षम असेल आणि त्यामध्ये उर्जा असेल तर यासाठी आपण सकाळी पुरेसे पाणी प्यावे. हे शरीराला हायड्रेटेड ठेवते आणि ऊर्जा देते.


5. देवाचे आभार मानून किंवा जवळच्या लोकांबद्दल सकाळी कृतज्ञता व्यक्त केल्याने, आपले व्यक्तिमत्त्व उदार होते. या व्यतिरिक्त आपण समोरील व्यक्तीच्या आत देखील सकारात्मकतेला जागृत करता.