मुंबई : देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढतायत. महाराष्ट्रातही कोरोनाचा कहर सुरूच आहे. गेल्या 24 तासांत 4205 नवीन रुग्ण आढळले आहेत. गुरुवारच्या तुलनेत हा आकडा नक्कीच कमी झाला असला तरी तीन जणांना जीव गमवावा लागला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही चिंतेची बाब म्हणजे, एका रुग्णाला BA.5 व्हेरिएंटची लागण झाल्याचं आढळून आलंय. 19 जून रोजी या रूग्णाला कोरोनाची लागण झाली होती. जीनोम सिक्वेन्सिंगनंतर BA.5 व्हेरिएंटची लागण झाल्याचं आढळून आलंय. तज्ज्ञांच्या मते, यापेक्षा गंभीर लक्षणं कोणत्याही रुग्णामध्ये दिसून येत नाहीत. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी आहे.


महाराष्ट्राशिवाय दिल्लीतही कोरोनाचा वेग भयानक आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्रकरणे हजाराच्या पुढे  आहेत. 


संपूर्ण देशाची आकडेवारी पाहिली तर गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाची 17 हजारांहून अधिक नवीन प्रकरणं समोर आली आहेत. देशात कोरोनाचा वेग वाढत असताना एक्टिव्ह रुग्णांची संख्याही वाढतेय. कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने देशातील एक्टिव्ह रुग्णांची संख्याही 90 हजारांच्या जवळ पोहोचली आहे.


देशातील वाढत्या कोरोना रुग्णांसाठी केरळ, महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांना जबाबदार धरलं जातंय. सर्वाधिक बाधित रूग्णांची नोंद या राज्यांतून होताना दिसतेय. केरळमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून हा आकडा तीन हजारांहून अधिक आहे.