मुंबई : गर्भधारणा किंवा प्रेग्नेन्सी ही प्रत्येक महिलेसाठी एक सुंदर भावना आहे. यामुळे एका महिलेला मातृत्व येतं असं म्हणतात. या काळामध्ये महिला जास्त भावनीक होतात. तसेच याकाळात महिलांना अनेक समस्यांचा सामना देखील करावा लागतो. महिलांना तिसऱ्या महिन्यापासूनच त्यांची आणि बाळाची काळजी घ्यायला सांगितले जाते. तसेच कोणतीही जड वस्तु देखील न उचलण्याचे महिलांना सांगितले जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु प्रसूतीची वेळ जसजशी जवळ येते तसतशी स्त्रीयांना काळजी वाटायला लागते की, त्यांची प्रसुती नॉर्मल होईल की, सिझेरियन होईल.


कारण तसे पाहाता प्राकृतिकदृष्ट्या होणारी प्रसुती ही सिझेरियनच्या तुलनेत कमी वेदनादायी असते. तसेच सिझेरियन केल्यामुळे शारीरिक त्रास मोठ्याप्रमाणावर होतो. ही प्रक्रिया खर्चिक आणि वेदनादायी असते. ज्यामुळे महिलांना सिझेरियन करायचे नसते.


म्हणून मग नॉर्मल डिलेव्हरीसाठी महिला सुरुवातीपासूनच काही ना काही अशा गोष्टी करु पाहतात की, ज्यामुळे त्यांची नॉर्मल डिलेव्हरी होईल. यामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम, चालणे अशा प्रकारच्या गोष्टी महिला करतात. तसेच यासाठी आहारातदेखील बरेच बदल करण्याचे सांगितले जाते. आज आम्ही आपणास अशाच काही उपायांची माहिती देणार आहोत, जे नॉर्मल डिलेव्हरीसाठी तुम्हाला फायदेशीर राहातील


लादी पुसणे


नववा महिना सुरू झाल्यानंतर काही वेळाने स्त्रियांनी पायावर बसून लादी पुसावी असे म्हणतात. कधीकधी डॉक्टर देखील स्वतः अशी गोष्ट करायला सांगतात. यामागचे असे कारण आहे की, बसून लादी पुसल्याने पेल्विक स्नायूंचा चांगला व्यायाम होतो आणि स्नायू थोडे शिथिल आणि लवचिक होतात, ज्यामुळे प्रसूती सुलभ होते.


उडीद डाळचे पाणी


असे म्हटले जाते की, गर्भावस्थेच्या नवव्या महिन्याच्या सुरुवातीला उडीद डाळ बनवून त्यातील पाणी काढून त्यात तूप टाकून प्यावे. असे केल्याने योनीमार्गात स्नेहन होते आणि प्रसूती सुलभ होते.


मेडिटेशन करा


गरोदरपणात स्त्रीने स्वत:ला तणावमुक्त ठेवणे फार महत्वाचे आहे. तणावामुळे गरोदरपणात अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. परंतु यागोष्टीचा तुमच्यावर ताण आणून देऊ नका आणि तुमच्या तणावावर नियंत्रण ठेवण्यासाठी, दीर्घ श्वासोच्छवासाच्या व्यायामासह ध्यान करा.


ध्यान केल्याने तुमचा ताण बर्‍याच प्रमाणात नियंत्रित होऊ शकतो. याशिवाय वेळ मिळेल तेव्हा फिरायला जा. पण कोणताही उपक्रम करताना आपल्या आजूबाजूला एखादी व्यक्ती ठेवा म्हणजे कोणतीही समस्या हाताळता येईल.


काळजी घ्या


आम्ही येथे सांगितलेली माहीतीला तुम्ही तेव्हाच फॉलो करा, जेव्हा तुमच्या गरोदरपणात कोणतेही कॉम्प्लीकेशन नसतील. तसेच कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी एकदा तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. गर्भधारणेदरम्यान, तज्ञांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे आणि जर तुम्हाला पूर्णपणे बेड रेस्ट घेण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला असेल, तर तो पाळावा. असे असल्यास वरील कोणतीही गोष्ट करु नये.