नवी दिल्ली : दर सात भारतीयांमध्ये एक जण मानसिक रुग्ण असल्याची माहिती संशोधनातून पुढे आली आहे. आरोग्य क्षेत्रातल्या आघाडीच्या लॅन्सेट या मॅगेझिनच्या सोमवारच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. मानसिक रुग्णांची संख्या गेल्या १९९० ते २०१७ या काळात दुप्पट झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यात मानसिक रोगींची संख्या सर्वाधिक असल्याचंही अहवालात पुढं आलं आहे. देशातल्या एकूण महिलांपैकी ३.७ टक्के महिला नैराश्याला बळी पडत असून पुरुषांमध्ये नैराश्याचं प्रमाण २.७ टक्के असल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 


याआधी लॅन्सेट या मॅगेझिनने अहवालातून आणखी एक धक्कादायक बाब उघड केली होती. भारत प्रदूषणाच्या बाबतीत सर्वात वरच्या स्थानी असल्याचं अहवालानुसार सांगण्यात आलं आहे. सध्याच्या आकडीवारीच्या आधारे, २०१७ मध्ये प्रदूषणामुळे भारतात २३.२६ लाख लोकांचा अकाली मृत्यू झाल्याची माहिती या अहवालातून समोर आली. प्रदूषणाच्या विविध पातळ्यांवर भारताची स्थिती सर्वात खराब असल्याचं सांगण्यात आलं आहे.


धक्कादायक! भारतात प्रदूषणामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू - सर्व्हे