Weather Update in Marathi: गेल्या काही दिवसांपासून वातावरण सतत तापत आहे. पारा 45 अंशाच्यावर गेला आहे. त्यामुळे मुंबईकरांना उन्हाच्या तप्त झळांचा तडाखा सहन करावा लागत आहे. यामुळे शरीरातील पाणी कमी होणे आणि संसर्गजन्य आजार जडण्याचे प्रकार वाढले असून त्याचा विपरीत परिणाम आरोग्यावर दिसून येत आहे. गेल्या आठवड्यापासून तापमानात प्रचंड वाढ झाली. त्यामुळे अनेक भागात गर्मीची लाट पसरली आहे. पाऊस येण्याआधी तापमानामध्ये दरवर्षी वाढ झाल्याची नोंद केली जाते. मात्र यंदाचा ऋतू बदलाचा काळ मुंबईकरांसाठी जास्तच त्रासदायक ठरत आहे. अशा वातावरणामध्ये विषाणू आणि जीवाणूंची वाढ झपाट्याने होत आहे. यामुळे सर्दी, खोकला, घसा यांसारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्दीच्या बरोबरीने दवाखान्यामध्ये येणारे 50 ते 60  टक्के रुग्ण हे घशाला संसर्ग झालेले आहेत. उन्हाळ्यामुळे बाहेर फिरताना कोल्डड्रिंक, बर्फाचा गोळा, लस्सी, थंड पेय असे पदार्थ खाले जातात. त्याचा परिणाम घशावर होतो. घसा खवखवणे, घशाला सूज येणे अशा तक्रारी यामुळे वाढल्या आहेत. हे सर्व टाळण्यासाठी उन्हाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणे किंवा बर्फगोळा सारखे पदार्थ टाळण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. उन्हामध्ये फिरताना घाम येतो. यामुळे शरीरातील पाणी कमी होते. तसेच क्षारही कमी होतात. अशावेळी त्वचेवर घाम राहिल्यामुळे त्वचेचे आजार होतात. 


तसेच वाढत्या तापमानामुळे उन्हामुळे अनेकांमध्ये पित्तप्रकोप वाढला आहे. अनेकदा पित्ताच्या वाढीमुळे घशातील खवखव वाढते.  पित्त आणि कोल्ड्रिंक्सच्या सेवनामुळे घशाला सूज येण्याचे प्रकार वाढले आहेत.  घशातील संसर्गामुळे खाताना त्रास होणे, तापाची लक्षणांना सामोरे जावे लागत असल्याचे डॉ. धीरजकुमार नेमाडे म्हणाले. बॉम्बे हॉस्पिटलच्या 'कान-नाक-घासा' विभागाचे सल्लागार डॉ. मिनेश जुवेकर यांनी लहान मुलांच्या इच्छेनुसार समावेशाबाबत माहिती दिली. 


अशी घ्या काळजी 


 वाढत्या तापमानामुळे काही लोकांच्या त्वचेवर लाल पुरळ येतात. लहान मुलांना घामोळ्याचा त्रास वाढत आहे.  त्यामुळे उन्हाळ्यात स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे आहे. डॉक्टर दिवसातून दोनदा अंघोळ करण्याचा सल्ला देतात. बाहेर जाताना गॉगल वापरणे आणि डोके आणि त्वचा झाकणे आवश्यक आहे. तत्काळ वैद्यकीय उपचार घेणे देखील आवश्यक आहे. तसेच  थंडपेये पिणे टाळा, दुपारचे उन्हात फिरणे टाळा, साधे पाणी प्या, घरातून पाणी घेऊन बाहेर पडा, मुखपट्टीचा वापर करुन स्वत:ची काळजी घ्या...