Reduce Cholesterol: चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे अनेक समस्या मागे लागतात. यावेळी रक्तवाहिन्यांमध्ये जमा होणाऱ्या कोलेस्ट्रॉलपासून हृदयाला मोठा धोका देखील असतो. कोलेस्टेरॉल हे स्ट्रोक, हार्ट फेल्युअर आणि कार्डियाक अरेस्टचं प्रमुख कारण मानलं जातं. अशा स्थितीत व्यायामाबरोबरच आहारही उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे आहारात कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास फायदा मिळू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी प्रोटीनयुक्त पदार्थांचं सेवन केलं पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणते पदार्थ आहारात घेणं तुमच्या फायदेशीर ठरू शकतं.


बदाम


प्रति 25 ग्रॅम बदामामध्ये सुमारे 5.3 ग्रॅम प्रोटीन असतं. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी बदाम हे एक उत्तम पदार्थ मानला जातो. त्यात हेल्दी फॅट असतं जे हृदयासाठी आरोग्यदायी असतं. बदामामध्ये फायबरसह ते सर्व घटक असतात, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि विविध आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करतात.


कॉटेज चीज


कॉटेज चीज हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उत्तम मानलं जातं. त्यात चरबीचं प्रमाण कमी आहे आणि प्रति 165 ग्रॅम सर्व्हिंगमध्ये 20.3 ग्रॅम प्रोटीन असतं. याव्यतिरिक्त, हे फायबरचा एक चांगला स्रोत आहे, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करतं.


ओमेगा 3 फॅटी ऍसिड


UK आरोग्य संस्था NHS च्या मते, ओमेगा फॅटी ऍसिडसयुक्त पदार्थ वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास तसंच चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यास मदत करतात. सूर्यफुलाच्या बिया, चिया सिड्स, अक्रोड, फ्लेक्ससीड्स, स्प्राउट्स इत्यादींचा आहारात भरपूर समावेश करा.


आहारात डाळीचा समावेश


सर्व प्रकारच्या डाळींमध्ये सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण खूपच कमी असते. त्यात कोलेस्टेरॉल कमी करणारे फायबर जास्त असतं. वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींमध्ये प्रोटीनचं प्रमाण वेगवेगळ असतं. कोणत्याही प्रकारच्या 120 ग्रॅम डाळीमध्ये सुमारे 8 ग्रॅम प्रोटीन असतात.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)