भारतात सर्पदंशामुळे तब्बल 50 हजार लोकांचा मृत्यू; साप चावल्यानंतर काय करावे? जाणून घ्या
Snakebite Treatment : विषारी चाप चावल्यानंतर काही लोकांचा अर्धा जीव हा घाबरुन जातो. सापाच्या दंशाने वेळीत उपचार न झाल्यास त्यात एखाद्याच्या जीव देखील जाऊ शकतो. त्यावर तातडीने उपचार करणं देखील गरजेचे आहे.
Snakebite Treatment News in Marathi : ग्रामीण भागासह शहरात ही सापाचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्यातच विषारी चाप चावल्यानंतर वेळीच उपचार न केल्यास त्या व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे सर्पदंश झाल्यानंतर लगेचच काहीतरी खबरदारी घेणे आवश्यक आहे. कारण देशात 300 हून अधिक सापांच्या प्रजाती आहेत. यापैकी 15-20 टक्के प्रजाती या विषारी सापांच्या प्रजाती आहेत. त्यापैकी नाग, मन्यार, घोणस आणि फुरसा हे चार विषारी साप मानवी वस्तीत आढळतात. याचपार्श्वभूमीवर सर्पदंशाने देशभरात होणारे मृत्यू निम्म्यावर आणण्यासाठी केंद्र सरकारने कृती योजना तयार केली आहे. नेमकी काय आहे योजना जाणून घेऊया...
आरोग्य मंत्रालयाने भारतात सर्पदंश प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राष्ट्रीय कृती योजना सुरू केली आहे. 'वन हेल्थ' पध्दतीच्या माध्यमातून 2030 पर्यंत सर्पदंशामुळे होणारे मृत्यू कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यावेळी सर्पदंशावरील पुस्तिका, 'काय करावे आणि काय करु नये' या विषयावरील पोस्टर्स आणि सर्पदंश जनजागृतीपर 7 मिनिटांचा व्हिडिओही सर्वसामान्यांसाठी शेअर करण्यात आला. हे विषारी साप चावल्यानंतर होणारे मृत्यू टाळण्यासाठी काय केले पाहिजे आणि काय केले पाहिजे याची नवीन माहिती सरकारने व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली आहे. यामध्ये सर्पदंशामुळे 2030 पर्यंत हे मृत्यू कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
तसेच सरकारने 15400 हा हेल्पलाइन क्रमांक जारी केला असून यावर तातडीने मदत मिळेल, अस आरोग्यमंत्र्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला तातडीने मदत मिळण्याच्या दृष्टीने या कृती योजनेत भर देण्यात आला आहे. पुदुच्चेरी, मध्य प्रदेश, आसाम, आंध्र प्रदेश तसेच दिल्लीत ही कृती योजना सुरुवातीला राबवली जाईल. सर्पदंश झाल्यानंतर तातडीने वैद्याकीय तसेच जनजागृतीसाठी माहिती उपलब्ध केली जाणार आहे. सर्पदंश झाल्यानंतर तातडीने वैद्याकीय सुविधा मिळाल्यास असे मृत्यू रोखणे शक्य असल्याचे यात स्पष्ट करण्यात आले.
केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्र यांनी याची घोषणा केली. राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांनी आपल्या गरजेनुसार कृती योजना विकसित करण्यावर भर द्यावा अशी सूचना यामध्ये करण्यात आली आहे. आरोग्य केंद्रांमध्ये याबाबतच्या औषधांची उपलब्धता तसेच अशा घटनांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना करण्याचे सुचवण्यात आले आहे. आशिया खंडात दरवर्षी 20 लाख सर्पदंशाच्या घटना होतात. अनेक घटनांची नोंदही होत नाही.
दरम्यान, विषारी साप चावल्यानंतर सर्पदंश हा जीवघेणा आजार ठरु शकतो. विषारी साप चावल्यामुळे वैद्यकीय समस्या उद्भवू शकतात ज्या प्राणघातक असू शकतात किंवा त्वरीत आणि योग्य उपचार न केल्यास आपल्या शरीराला हानी पोहोचवू शकते. भारतात, दरवर्षी अंदाजे 3-4 दशलक्ष सर्पदंशांमुळे सुमारे 50,000 मृत्यू होतात, जे जगभरातील सर्व सर्पदंश मृत्यूंपेक्षा कमी आहे. अहवालानुसार (2016-2020), भारतात सर्पदंशाच्या घटनांची सरासरी वार्षिक संख्या सुमारे 3 लाख आहे आणि सुमारे 2000 मृत्यू सर्पदंशामुळे होतात.
जेव्हा साप चावतो तेव्हा काय होते?
साप चावल्यानंतर शरीरात उलट्या, मळमळ, पोटदुखी, चक्कर येणे, डोकेदुखी, कमी रक्तदाब, तीव्र तहान लागणे, ताप येणे असे अनेक बदल होतात. यावर वेळीच उपाय केले तर जीव वाचू शकतो.