मुंबई : बऱ्याच लोकांना सवय असते की, ते घराबाहेर पडण्यापूर्वी परफ्यूम, डिओ किंवा इतर सुगंधीत गोष्टी वापरतात, जेणेकरून दिवसभर ते स्वत:ला फ्रेश ठेऊ शकतील. तसेच यामुळे समोरील व्यक्तीला घामाचा दुर्गंध देखील जात नाही. शक्यतो, ज्या लोकांच्या अंगाला घामाचा जास्त वास येतो, ते लोकं जास्त प्रमाणात अशा सुगंधीत गोष्टींचा वापार जास्त प्रमाणात करतात. ज्यासाठी लोकं अगदी महागडे प्रोडक्ट्स देखील वापरतात. या सुगंधी उत्पादनांपैकी सर्वात सामान्यता आपण वापरतो ते म्हणजे डियोड्रेंट  (Deodorant) किंवा अँटीपर्सपिरंट.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही वापरत असलेल्या डियोड्रेंट किंवा अँटीपर्सपिरंटमुळे कर्करोगासारखे गंभीर आजार होऊ शकतात? होय, काही अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की री-डिओडोरंट किंवा अँटीपर्सपिरंटचा जास्त वापर केल्याने तुम्हाला स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता आहे.


गेल्या काही वर्षांत, असंख्य अहवालांमध्ये असे म्हटले आहे की, डियोड्रेंट  (Deodorant) किंवा अँटीपर्सपिरंटमुळे स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्रेस्ट हा अंडरआर्मचा सर्वात जवळचा भाग आहे, ज्यामुळे हा कॅन्सर होण्याची शक्यता असते. पण प्रत्येकाच्या मनात प्रश्न असा आहे की, डियोड्रेंट  (Deodorant) किंवा अँटीपर्सपिरंट्सच्या वापरामुळे खरंच स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो का?


डियोड्रेंट आणि स्तनाचा कर्करोग यांच्यात काही संबंध आहे का?


अमेरिकन कॅन्सर सोसायटी आणि नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या मते, डियोड्रेंट  (Deodorant) आणि अँटीपर्स्पिरंट्सचा स्तनाच्या कर्करोगाच्या जोखमीशी संबंध जोडण्याचे फारसे ठोस पुरावे मिळालेले नाहीत.


तर नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट 2002 च्या अहवालानुसार, स्तनाचा कर्करोग असलेल्या 813 महिलांची तुलना स्तनाचा कर्करोग नसलेल्या 993 महिलांशी करण्यात आली आहे. या अहवालात अँटीपर्स्पिरंट्स, डियोड्रेंट  (Deodorant) किंवा अंडरआर्म शेव्हिंग आणि स्तनाचा कर्करोग यांच्यात कोणताही संबंध आढळला नाही.


2003 आणि 2009 च्या संशोधनात असे म्हटले आहे की हे परस्पर संबंध शक्य आहेत. मात्र, यासाठी कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत.


डियोड्रेंट  (Deodorant) आणि अँटीपर्स्पिरंट्सना पर्याय आहेत का?


प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगळे असते. एखाद्या व्यक्तीला जी गोष्ट आवडेल ती गोष्ट दुसऱ्यासाठी त्याच प्रकारे काम करते असे नाही. अशा परिस्थितीत, आपण स्वतःहून काही नैसर्गिक आणि दुर्गंधीनाशक पर्याय स्वीकारू शकतो, जसे की बेकिंग सोडा, लिंबू इत्यादी.