मुंबई : भारतात आता सर्वत्र थंडीचे वातावरण आहे. पुढील दोन दिवस राजधानी दिल्लीसह हरियाणा, राजस्थान, यूपी आणि पंजाबमधील लोकांना थंडीच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे. येवढेच काय तर, महाराष्ट्र ही सध्या गारठला आहे. महाराष्ट्रातील बहुतेक भागात गारा देखील पडत आहेत. अशा परिस्थितीत लोक थंडीपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी काही ना काही उपाय करत असतात. परंतु हे लक्षात घ्या की काही उपाय हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतात. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला थंडीपासून दूर राहण्याचे उपाय सांगणार आहोत, जे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे तुम्ही देखील अशा मार्गांचा वापर करत असाल, तर वेळीच सावध व्हा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर जाणून घ्या हिवाळ्यात थंडी कशी टाळायची


हीटरचा वापर कमी करा


थंडी टाळण्यासाठी आणि खोलीचे तापमान कमी करण्यासाठी लोक हिटरचा वापर करतात, असे अनेकदा दिसून येते. पण, त्याचा दीर्घकाळ वापर तुमच्यासाठी हानिकारकही ठरू शकतो. थंडी कमी करण्यासाठी, हीटरमुळे हवा आणखी कोरडी होते. अमेरिकन ऑस्टियोपॅथिक कॉलेज ऑफ डर्मेटोलॉजी (एओसीडी) च्या अहवालानुसार, हीटरच्या वापरामुळे त्वचा अधिक कोरडी होते.


गरम पाण्याचा वापर


बर्‍याच अहवालांमध्ये त्वचा विशेषज्ञ आणि न्यूयॉर्क शहरातील फिफ्थ अव्हेन्यू एस्थेटिक्सच्या संस्थापक मेरी हयाग यांनी असे म्हटले आहे की, दीर्घकाळ गरम पाण्याने आंघोळ करणे हानिकारक असू शकते. गरम पाणी शरीराच्या संपर्कात बराच काळ राहिल्यास त्वचा कोरडी पडू लागते. त्यामुळे थंडी टाळण्यासाठी गरम पाणी वापरत असाल तर जास्त गरम पाणी वापरू नका आणि जास्त वेळ आंघोळ देखील करू नका.


उबदार कपडे


हिवाळ्यात उबदार कपडे घालणे खूप महत्वाचे आहे. परंतु बरेचदा लोक स्वेटर थेट त्वचेवर घालतात. असे करणे हा चुकीचा पर्याय आहे. हिवाळ्यात सरळ लोकरीचे कपडे किंवा किंचित उग्र कपडे घालणे टाळावे. त्यामुळे अॅलर्जी, त्वचा कोरडी होण्याची भीती असते. त्यामुळे जेव्हाही तुम्ही गरम कपडे घालाल तेव्हा सर्वात आधी खाली सुती किंवा मऊ रेशमी कापड घाला आणि त्यावर उबदार कपडे घाला.


अल्कोहोल वापरू नका


खूप थंडी असताना बरेच लोक उष्णतेसाठी दारूचा अवलंब करतात. दारू प्यायल्याने थंडी कमी लागते असा त्यांचा समज आहे. अल्कोहोल प्यायल्याने तुम्हाला गरम वाटू शकते कारण त्यामुळे तुमच्या त्वचेच्या पृष्ठभागावर रक्त वाहू लागते. परंतु, ते प्रत्यक्षात तुमच्या रक्तवाहिन्या पसरवते आणि त्यामुळे उष्णता लगेच कमी होते.


थंडीत अल्कोहोल प्यायल्याने थरथरण्याची प्रक्रियाही कमी होते, ज्यामुळे शरीरात अतिरिक्त उष्णता निर्माण होते. परंतु तुम्हाला यामुळे सर्दी होऊ शकते.