मुंबई : आपल्या शरीरीच्या अनेक भागांबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. अपुऱ्या माहितीमुळे आपण अनेकदा कोणत्याही गोष्टीकडे फरसे लक्ष देत नाही. आता तुम्ही हे देखील पाहिलं असेल की, बहुतेक लोकांच्या नखांवरती काही पांढरे डाग दिसतात. बऱ्याचदा हे लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसतात. त्यामुळे तुम्ही लहान असताना, तुमच्या देखील नखांवरती असे डाग आलेले पाहिले असेल. परंतु असे का होते? या मागचं खरं कारण फारच कमी लोकांना माहिती आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकांचा असा विश्वास आहे की याचे कारण शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे किंवा काही लोकं अंधश्रद्धेनं असं देखील म्हणतात की, असं होण्यामागचं कारण शनीचा प्रकोप असू शकतो. पण तसे नाही. यामागची इतरही अनेक कारणे असू शकतात. जाणून घ्या यामागचे नेमके कारण काय आहे?


सायन्स फोकसचा अहवाल सांगतो, नखांवर असे पांढरे डाग तात्पुरते असतात. त्याला वैज्ञानिक भाषेत ल्युकोनीचिया (leukonychia) म्हणतात. नखांवर अशी खूण आल्यानंतर ती हळू हळू निघून देखील जाते. याचे कारण म्हणजे नखांची वाढ. नखे हळूहळू वाढतात, म्हणून हे  निशान नखं वाढल्यानंतर हळूहळू पुढे येऊन नंतर निघून जातात.


परंतु आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की, असं का होतं? हे चिन्ह का दिसतात?


अहवालात असे म्हटले आहे की, नखांवर अशा पांढऱ्या खुणा मुलांमध्ये जास्त दिसतात. याची दोन मुख्य कारणे आहेत. कुपोषण म्हणजे शरीरात पोषक तत्वांची जास्त कमतरता. दुसरे म्हणजे, शरीरातील रक्तातील प्रथिनांच्या प्रमाणाचे काम. बहुतेक लोक याचे कारण कॅल्शियमची कमतरता मानतात, जे चुकीचे आहे.


हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, असे होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे शरीरातील मिनिरल्‍सची कमतरता, परंतु यामागे आणखी काही कारणे असू शकतात. जसे की ऍलर्जी, बुरशीजन्य संसर्ग आणि नखांना झालेली दुखापत.


कधीकधी नखे खराब झाल्यावरही अशी खूण दिसून येते. तथापि, आहारात आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करून त्यांचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी केला जाऊ शकतो.


रिपोर्टनुसार यामागे आणखी काही कारणे असू शकतात. जसे की, हृदयविकार, मूत्रपिंड निकामी होणे, एक्जिमा, न्यूमोनिया, आर्सेनिक विषबाधा. परंतु हे लक्षात घ्या की, या कारणांमुळे नखांवरती पांढरे डाग दिसण्याच्या प्रकरणांची क्वचितच नोंद झाली आहे.  त्यामुळे पुढच्या वेळी नखांवर पांढरा डाग दिसला की त्याचे कारण शोधा आणि डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.