हाताच्या कोपराला लागल्यावर का बसतो करंट? जाणून घ्या या मागील सायन्स
आपल्या शरीराला कुठेही लगल्यामुळे त्या भागात आपल्याला दुखायला लागतं. मग हाताच्या कोपराला लागल्यावर आपल्याला शॉक का लागतो?
मुंबई : आपल्याला लहानपणापासून पुस्तकात वाचल्यामुळे किंवा कुठे तरी पाहिल्यामुळे काहीना काही एक्स्प्रिमेंट करण्याची सवय असते. जे आपण समोरील लोकांना कुतुहलाने दाखवतो आणि जादु असल्यासारखे भासवतो. यामध्येच आपण लहानपणापासून करत असलेली गोष्ट म्हणजे कोपराला करंट लागणे. बऱ्याचदा शाळेतील मुलं एखादी जादु असल्यासारखं याकडे पाहातात. एवढंच काय तर आपण बऱ्याचदा अनुभवलं देखील असेल की आपल्या कोपराला धक्का बसला की आपल्याला शॉक लागल्या सारखे होते.
परंतु तुम्ही कधी विचार केलाय का की, असं का होतं? आपल्या शरीराला कुठेही लगल्यामुळे त्या भागात दुखायला लागतं. मग हाताच्या कोपराला लागल्यावर आपल्याला शॉक का लागतो? खरंत हा प्रवाह कोपरच्या हाडात उद्भवतो.
तज्ज्ञांच्या मते, कोपरातून जाणाऱ्या या हाडांना फनी बोन्स म्हणतात. जेव्हा हे हाड एखाद्या गोष्टीशी आदळते, तेव्हाच आपल्याला जोरदार प्रवाह येतो. कोपराच्या या भागातून अल्नर नर्व्ह जाते. या मज्जातंतूलाच विद्युत दाबाचे मुख्य कारण म्हटले जाते.
आपल्या शरीरातील हाडे आणि मज्जातंतूंचे संरक्षण करण्यासाठी चरबीचा थर जमा होतो आणि वरती त्वचा येते.
ज्यामुळे आपले कोपर एखाद्या घन वस्तूवर आदळते तेव्हा अल्नर मज्जातंतूला तीव्र धक्का बसतो. यामुळे आपल्याला करंट, गुदगुल्या, वेदना किंवा तीक्ष्ण मुंग्या आल्यासारखे वाटते. त्यामुळे आपल्या शरीरातील अल्नर नर्व्हला दुखापत होते.
पुढच्या वेळी जर तुम्हाला तुमच्या कोपरात करंट लागला तर असे समजा की अल्नार मज्जातंतूवर झालेली जखम यासाठी जबाबदार आहे.
शरीराच्या इतर कोणत्याही भागात हे का घडत नाही?
तुमच्या हे लक्षात आले असेल की फक्त कोपराच्या हाडांना विद्युत प्रवाह जाणवतो. हे शरीराच्या इतर कोणत्याही सांध्यावर कधीच जाणवत नाही. परंतु असे का होते का प्रश्व अनेकांना पडला आहे. तर हे जाणून घ्या की कोपर आणि खांद्यामधील हाडांना ह्युमरस म्हणतात. त्याच वेळी, ulnar चेता आपल्या मणक्यापासून उद्भवते. ते सरळ खांद्यापासून बोटांपर्यंत पोहोचते.
जेव्हा कोपर कोणत्याही कडक वस्तुवर आपटतो तेव्हा, तेव्हा न्यूरॉन्स आपल्या मेंदूला सिग्नल पाठवतात. ज्यामुळे आपल्याला विद्युतप्रवाहाचा धक्का बसल्यासारखे वाटते.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमान करत नाही.)