मुंबई : सध्या मुंबईकरही डिसेंबर महिन्यातील हवीहवीशी वाटणारी थंडी अंगावर घेत सकाळी ल लवकरच आपल्या कामाला सुरुवात करताना दिसत आहेत. कामाला जायची घाई नसेल तर काही जण घरीच आपल्या शरीराला थोडा ताण देत व्यायाम करून आपला आळस झटकण्याचा प्रयत्न करताना दिसतात. सध्या एका जागी बसून काम करण्याचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे शारीरिर थकव्यासोबत मानसिक थकवाही अनेकांना जाणवतो... हा थकवा दूर करायचा सोपा उपाय आहे तो म्हणजे व्यायाम... पण, काही जणांना थंडीच्या दिवसांत जीममध्ये जाण्याचं सोडाच घरीही व्यायाम करण्याचा कंटाळा आलेला दिसतो... आणि अर्थातच त्याचा परिणाम शरीरावर दिसून येतो. पण, तुम्ही नियमित व्यायाम करत असाल तर त्याचा परिणामही तुमच्या चेहऱ्यावर आणि उत्साहात दिसून जाणवेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण, मग व्यायाम करण्याचा अ्नेक जण कंटाळा का करतात? आणि हा कंटाळा कसा टाळता येईल? हे पाहुयात... 


- व्यायाम करतानाही तुम्ही तोच तोच व्यायाम करत असाल तर तुम्हाला कंटाळा येऊ शकतो. हे टाळण्यासाठी तुम्ही कल्पकतेनं तुमच्या व्यायामाच्या प्रकारांत मजा आणू शकता... रुटीनमध्ये थोडा बदल ठेवा... चालायला जात असाल तर कधी जॉगिंग करून बघा. जाण्याचा रस्ता बदला. जिममध्येही वेगवेगळ्या प्रकारचे व्यायामप्रकार ट्राय करा. एखाद्या दिवशी तुम्ही फक्त डान्स करा.


- व्यायामामागे एखादी प्रेरणा असायला हवी. व्यायामाचे नेमके उद्दिष्ट असायला हवे. समोर व्यायामाचे नेमके उद्दिष्ट नसेल तर कंटाळा येणारच. त्यामुळे तुम्ही व्यायाम का करताय, हे ठरवा. वजन कमी करायचं असेल तर ते ध्येय डोळ्यासमोर ठेवा. तुम्हाला एखाद्या हिरोइनसारखी फिगर हवी असेल तर त्याबद्दल विचार करा. तुमच्यासमोर ध्येय असेल तर तुम्ही ते साध्य करण्यासाठी प्रयत्न कराल.


- व्यायामासाठी सोबत शोधा. एखाद्या मैत्रिणीला पटवून तिला जीम जॉईन करायला सांगा. दोघी एकत्र गेलात तर व्यायामालाही मजा येईल आणि एकमेकंच्या सोबतीने व्यायामही सुरू राहील. वॉकला जाताना तुम्ही कोणाला तरी सोबत नेऊ शकता. कुटुंबातल्या एखाद्या सदस्याला वेळ असेल तर त्याच्यासोबतही तुम्ही व्यायामाला जाऊ शकता.