International Yoga Day: बाळाचे प्लानिंग करताना योगाभ्यासाची `अशी` होईल मदत
International Yoga Day: २१ मे हा आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. नियमित योगासने केल्यास आपले शरीर संतुलित राहते, मन प्रसन्न राहते.
Internation Yoga Day: २१ मे हा आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. नियमित योगासने केल्यास आपले शरीर संतुलित राहते, मन प्रसन्न राहते. अनेक व्याधी, अडचणींमध्ये आपल्याला योगाची मदत होते. संततीप्राप्तीसाठी प्रयत्नांची शर्थ करणारी जोडपी देखील योगासनांची मदत घेतात. यामुळे चांगले परिणाम दिसून आलेल्यांची संख्या मोठी आहे. योगाभ्यासामुळे होणाऱ्या फायद्यांची माहिती घेऊया.
हार्मोन्स-संतुलन महत्त्वाचे
पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS), थायरॉईडचा त्रास यासारखे विकार हार्मोन्सच्या असुंतलनामुळे निर्माण होतात अनेकदा वजन वाढीस कारणीभूत ठरतात. माफक आहार आणि जीवनशैलीतील बदल यांच्या जोडीला नियमित योगासने केल्यामुळे शारीरिक चयापचयाच्या (मेटॅबॉलिझम) मध्ये हळूहळू सुधारणा होऊ शकते. हे लक्षात ठेवा की योग हा हार्मोनल असंतुलनासाठी फायदेशीर ठरू शकतो, तरी त्या सोबत वैद्यकीय उपचार चालू ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे.
मन आणि शरीर यांची सुदृढ जोड
योगाभ्यासामुळे मानसिक अवधान तल्लख होऊन मन आणि शरीर यांच्यातील जोड सुदृढ होतो. पती-पत्नी जोडीला एकमेकांशी जुळवून घ्यायला मदत होते, त्यांच्यातील ताळमेळ सुधारतो. पती-पत्नी यांनी मिळून, एकत्र योगाभ्यास केला तर अधिक चांगले. त्यांच्यातील प्रेमाचे नाते, त्यांच्यामधील संवाद वाढून ते संततीप्राप्तीच्या साधनेत चांगलेच साहाय्यभूत ठरते.
रक्ताभिसरणात सुधारणा
काही योगासनांमधील हळुवार केलेल्या स्नायूंच्या हालचालींमुळे रक्ताभिसरणामध्ये सुधारणा होते. कटिप्रदेशात (ओटीपोटी किंवा पेल्व्हिक भागात) रक्ताभिसरण सुधारले तर तिथला ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो आणि त्याचा प्रजननाच्या कार्यात गुंतलेल्या सर्व अवयवांना आणि ग्रंथींना फायदा मिळतो. त्याची गर्भधारणेला निश्चित मदत मिळते.
आरोग्यदायी फायदा
नियमित योगाभ्यासामुळे इतर व्याधींपासूनही दिलासा मिळू शकतो. पोटदुखी, कंबर/पाठीचे दुखणेकमी होणे, थकव्याचे प्रमाण कमी होणे यासारखे फायदे अतिशय महत्त्वाचे आहेत. स्वतःच्या मनाची आणि शरीराची अशारितीने काळजीपूर्वक मशागत करणे हा योगाभ्यासाचा उद्देश आहे. वर उल्लेख केलेल्या संततीप्राप्तीच्या तणावपूर्ण प्रयत्नांमध्ये चांगला मार्ग काढण्यासाठी योगाभ्यास खूप उपयुक्त आहे.
चिंता आणि तणाव
गर्भधारणेत येत असलेल्या अपयशामुळे प्रचंड मानसिक तणाव निर्माण होतो. त्या समस्येवर उपाय शोधण्याच्या प्रयत्नात आणि वैद्यकीय उपाय योजनेदरम्यान त्या तणावात भर पडते. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी योगाभ्यास एक अत्यंत उपयुक्त साधना आहे. माफक आहार, नियंत्रित खोल श्वासोच्छवास, चिन्तन आणि व्यायाम करण्याच्या योगिक पद्धती अंगीकारून तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्स हळूहळू ताबा मिळवणे शक्य आहे. तयासाठी आपल्या रोजच्या व्यवहारांमध्ये योगाभ्यासासाठी वेळ द्यायला हवा. तसे केले तर चिंता-तणावाचा योग्य रीतीने सामना करणे शक्य होईल.
मूल होण्याची आशा सफल होण्यासाठी साकल्याने (सर्वतोपरी) प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी वैद्यकीय उपचारांच्या जोडीला योभ्यासही केला तर सर्व प्रयत्नांचे फलदायी संतुलन होऊ शकते, प्रयत्न सुरु ठेवण्याचे सामर्थ्य मिळते आणि गर्भधारणेची शक्यता सुधारते. हा प्रवास जोडीने करायचा असतो म्हणून दोघांनी योगाभ्यासाचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे, असा सल्ला नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीच्या प्रजनन सल्लागार डॉ स्नेहा साठे देतात.