मुंबई : आजच्या दिवसांमध्ये प्रत्येक दिवसाचे एक वेगळे महत्व आहे. त्याचप्रमाणे आज कॉफीचा दिवस आहे. रोजच्या कामाचा ताण, नैराश्य, नोकरी, ट्रफिक आणि आपली सतत बदलती जीवनशैली याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. परिणामी त्वचा आणि केसांचे आरोग्यही बिघडते. त्यासाठी रोज एक कप कॉफी पिणे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. त्याचबरोबर केसांचे आणि त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी कॉफीचा वापर केला जातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- आरोग्याशिवाय एक कप कॉफी केस आणि त्वेचेसाठी फायदेशीर ठरते. कॉफीमुळे त्वचा तजेलदार होते. त्याचबरोबर केसगळती थांबते. कॉफीमध्ये मिनरल्स, अंटीऑक्सिंडेंट यांसारखे आवश्यक घटक असतात. त्यामुळे त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत.


- त्वचेला तजेलदार होण्यासाठी अंटीऑक्सिंडेंट खूप गरजेचे असतात. स्क्रब म्हणून कॉफीचा वापर करा. त्यासाठी कॉफी पावडरमध्ये काही थेंब पाणी घालून पूड तयार करा आणि त्याने चेहऱ्याला स्क्रब करा. त्यामुळे तुमच्या त्वचेवरील खुले छिद्र बंद होण्यास मदत होईल.


- केसांना कलर करण्यासाठी कॉफी अत्यंत चांगला उपाय आहे. केसांना केमिकल्सयुक्त रंगापासून वाचवण्यासाठी कॉफी पावडरमध्ये पाणी मिसळा आणि केसांना लावा. १० ते १५ मिनिटे ठेवून केस कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. 


- केसांची वाढ होत नसल्यास कॉफीचा कंडीशनर म्हणून वापर करा. कंडीशनरमध्ये कॉफी मिसळून केसांवर लावा. २० ते ३० मिनिटांनी केस स्वच्छ धुवा. त्यामुळे केस मुलायम व चमकदार होतील.