मुंबई : आजच्या धकाधकीच्या आणि व्यस्त वेळापत्रकामुळे आरोग्याच्या अनेक समस्या डोकं वर काढत आहेत. बदलती जीवनशैली त्यामुळे वाढते नैराश्य, तणाव इत्यादी गोष्टींच्या जाळ्यात माणुस अडकत आहे. यावर संयम बाळगायचे असल्यास योगसाधना हा एक प्रभावशाली मार्ग आहे. शरीर, मन आणि आत्मा यांच्यातील एकत्व अनुभवण्याची पद्धत म्हणजे योग. शास्त्रामध्ये सुद्धा योगसाधना आरोग्यास फायदेशीर असल्याचे सांगण्यात आले आहे. एवढेच नाही तर, खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसुद्धा याचे महत्व जनतेला पटवून देत आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर 'हस्तासन' करताना व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा अॅनिमेटेड व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी 'हस्तासन'चे प्रकार करताना दिसत आहेत. 


व्हिडिओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये ''योग्य पद्धतीने 'हस्तासन' केल्यास अन्य कोणतेही योगासन तुम्ही अत्यंत प्रभावशाली रितीने करू शकता'', असे लिहिले आहे. गवतामध्ये योगासने करणे अत्यंत लाभदायक असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले आहे. 'हस्तासन' कोणी करावे आणि कोणी करू नये, हे देखील व्हिडीओमध्ये सांगण्यात आले आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगाविद्या आणि योगसाधनेचे महत्व पटवून देत, २०१४ साली झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला आणि संयुक्त राष्ट्रांनी या प्रस्तावास मान्यता दिली. तेव्हापासूनच जगभरात २१ जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.