Use of gulal in ganesh visarjan: सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरूंय आणि बाप्पाची मिरवणूक म्हंटली की गुलालाची उधळण आलीच. पण हा गुलाल रंगाचा बेरंगही करू शकतो. कारण भेसळ माफियांनी आता गुलालात भेसळखोरी सुरू केलीय. नंदुरबारमध्ये तब्बल 60 गोण्या भेसळयुक्त गुलाल जप्त करण्यात आलाय. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या भेसळयुक्त गुलालाची विक्री केली जाणार होती. मात्र पोलिसांना याचा सुगावा लागला आणि त्यांनी सापळा रचून गुलालातल्या भेसळीचा भांडाफोड केलाय. गुलालाकडे कुणी फारसं गांभीर्यानं पाहत नसलं तरी हा भेसळयुक्त गुलाल शरीरासाठी मोठा हानिकारक ठरू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भेसळयुक्त गुलालात अतिरिक्त प्रमाणात रसायनांचा वापर केलेला असतो. त्यामुळे त्वचेचे आजार होऊ शकतात. कर्करोग, फुफ्फुसांचे आजार होण्याची भीती आहे. हा गुलाल डोळ्यात गेल्यास दृष्टी देखील जाऊ शकते. याशिवाय या गुलालामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषणही होतं. 


त्यामुळे सण, उत्सवकाळात गुलालाची उधळण करताना काळजी घ्या. तुम्ही विकत घेतलेला गुलाल भेसळयुक्त तर नाही ना याची खात्री करून घ्या. अन्यथा आनंदासाठी उधळलेला गुलाल तुम्हाला महागात पडू शकतो. 


याबाबत तज्ज्ञ काय म्हणतात? पाहा व्हिडीओ :