दिल्ली : प्रत्येक व्यक्तीला काही प्रमाणात भीती ही वाटतेच. तुम्ही भीतीबद्दल अनेक गोष्टी आतापर्यंत ऐकल्या असतील. अशा परिस्थितीत, एक प्रश्न उद्भवतो की 'भीती'चा वास घेता येतो किंवा जाणवता येतो का? या प्रश्नाचं उत्तर नुकत्याच झालेल्या एका संशोधनात सापडलं आहे. या अभ्यासाच्या परिणामांनुसार, भीतीचा वास घेणं शक्य आहे, परंतु जर एखादी स्त्री असेल तरच हे घडू शकतं.


मानसशास्त्रज्ञांचं परिक्षण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या संशोधनात 214 पुरुष आणि महिलांचा समावेश होता. प्रत्येकाला मास्कच्या साहाय्याने घामाच्या वासाचे नमुन्यांचा वास घ्यायचा होता. वैज्ञानिक तथ्यांचं निरीक्षण केल्याने असं दिसून आले की, त्रासलेल्या लोकांचा वास जाणवल्यानंतर महिलांचं वर्तन आश्चर्यकारकपणे बदललं. 


मानसशास्त्रज्ञांनी या कामासाठी सभागृहात सार्वजनिक भाषण ऐकणाऱ्या लोकांसह क्रीडांगणात उपस्थित असलेल्या लोकांच्या घामाचे नमुने गोळा केले होते. या प्रक्रियेदरम्यान महिलांना खेळ खेळण्यास देखील सांगण्यात आलं होतं. 


असा दिसून आला मोठा बदल


हेनरिक हेन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सांगितलं की, अभ्यासाचे परिणाम महिलांच्या सामाजिक विकासाद्वारे देखील समजू शकतात. उदाहरणार्थ, चिंताग्रस्त व्यक्तीच्या घामाचा वास घेतल्यानंतर स्त्रिया कमी विश्वसनीय स्त्रोतांवर विश्वास ठेवतात आणि अधिक जोखीम घेण्याचा प्रयत्न करतात. तर सामान्य परिस्थितीत त्या अशा विचित्र वागत नाही.