मुंबई : अंड हे आरोग्यदायी आणि पोषक  अन्नघटक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंड्यामध्ये व्हिटॅमिन, कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न असे अनेक अत्यावश्यक घटक असतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्याला किंवा झटपट अनेक चविष्ट पदार्थ बनवण्यासाठी अंड्याचा वापर  करतात.  


वजन आटोक्यात ठेवण्यासाठी किंवा कमजोर शरीरयष्टीच्या लोकांना वजन वाढवण्यासाठी अंड फायदेशीर ठरते. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. त्यामुळे आहारात अंड्याचा अतिप्रमाणात समावेसह झाल्यास नेमके काय होते? याबाबतचा हा एक्सपर्ट सल्ला नक्की जाणून घ्या.  


एका दिवसामध्ये किती अंडी खाणं आरोग्यदायी आहेत ?  


एका दिवसामध्ये दोन अंडी खाणं अगदीच फायदेशीर आहे. परंतू त्यापेक्षा अधिक अंड्यांचा समावेश करणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकते. 


एका अंड्यामध्ये १८५ मिग्रॅ कोलेस्ट्रेरॉल असते. दिवसभरामध्ये  ३०० मिग्रॅ कोलेस्टेरॉलचा समावेश  करणं सुरक्षित आहे. 


३-४ अंडी खाणं कोलेस्टेरॉलची पातळी वाढवण्याचा  धोका अधिक गंभीर करू शकतात.  उन्हाळ्याच्या दिवसात याचे प्रमाण कमी केले जाते. तसेच बॉडी बिल्डर्स आणि मसल्स  वाढवण्याचा प्रयत्न करणारेदेखील डाएट एक्सर्ट्च्या सल्ल्यानेच अंड्याच्या सेवनाची निवड करतात.  


एकावेळी खूप अंडी खाल्यास काय होते ? 


अंड्यामुळे शरीरात उष्णता वाढते. परिणामी अस्वस्थता, पचनाचा त्रास वाढतो. 


कोणत्या स्वरूपात अंड्याचे सेवन करावे ? 


अंड उकडलेले हे इतर कोणत्याही पदार्थापेक्षा अधिक फायदेशीर आहे. अंड्याच्या फ्राईड पदार्थांमध्ये तेलाचा अतिवापर आरोग्याला हानीकारक ठरते.