मुंबई : झटपट नाश्त्याचा पर्याय म्हणून अंड्याची निवड केली जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळच्या वेळेस घाई होते म्हणून अनेकजण अंडी उकडून फ्रीजमध्ये ठेवतात. पण सोयीचं व्हावे  म्हणून अशाप्रकारे करणं खरंच आरोग्यदायी आहे का ?  


उकडलेली अंडी किती दिवस टिकतात ? 


उकडलेली अंडी तुम्ही फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकता. जर उकडलेली अंडी कवचासह ठेवली तर आवडाभर तुम्ही ती खाऊ शकता. पण जर उकडलेलं अंड सोललेले असेल तर ते 3-5 दिवसांमध्ये खावे लागते. 


वाफवलेले अंड कसे ठेवावे ?  


अंड वाफवलेले असेल तर तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवावे. तसेच वाफवलेले अंड हवाबंद डब्ब्यामध्ये ठेवा. अंड्याला मॉईश्चरायाझर  मिळाल्यास ते खराब होऊ  शकते. 


वाफवलेले पण कवच न काढलेले अंड खराब होऊ शकते ? 


कवचावरील बॅक्टेरिया पाण्याअम्ध्ये वाफवताना नष्ट होतात. त्यामुळे बॅक्टेरियाचा थेट धोका कमी होतो. 


अंड खराब झाल्याचे कसे ओळखाल ?  


खराब झालेल्या अंड्याला वास येतो. त्याच्या दुर्गंधीवरून तुम्ही हे ओळखू शकता.  उग्र वास येत असल्यास अंड खाऊ नका. 


वाफवलेले अंड इतर प्रकारापेक्षा अधिक फायदेशीर आहे का ? 


अंड तुम्ही कोणत्याही स्वरूपात खाऊ शकता. वाफवलेले अंड हा थोडा आरोग्यदायी प्रकार आहे. तेलकट किंवा तळलेल्या अंड्याच्या प्रकाराचा आरोग्याला अधिक धोका आहे.