मुंबई :  अन्न शिजवण्यासाठी मायक्रोव्हेवचा वापर करावा का ? हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अन्नातील आवश्यक पोषणघटक मायक्रोव्हेवमध्ये नष्ट होतात असा तुमचा 
समज असेल तर हा खास नक्की वाचा. 


आहारतज्ञ प्रिया काथपाल यांच्या सल्ल्यानुसार पोषकघटक नष्ट होण्याचं प्रमाण हे पदार्थ कशावर शिजवतात त्यापेक्षा कितीवेळ शिजवता यावर अधिक अवलंबून असतात. 


मायक्रोव्हेव अधिक सुरक्षित 


मायक्रोव्हेवमध्ये झटपट अन्न शिजवता येतं. त्यामुळेच वॉटर सोल्युबल घटक नष्ट होण्याचा धोका मायक्रोव्हेवमध्ये कमी असतो. व्हिटॅमिन सी सारखे हीट सेन्सिटीव्ह घटक मायक्रोव्हेवमध्ये अन्न शिजवताना टिकून राहतात. 


काही मासे तव्यावर तळणं अधिक धोकादायक ठरतं. त्यापेक्षा मायक्रोव्हेवचा वापर करणं कॅन्सरजन्य घटकांच्या निर्मितीला रोखायलामदत करते. 


मायक्रोव्हेव वापरताना या चूकीच्या सवयी टाळा - 


पदार्थ असुरक्षित प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये किंवा त्यामध्ये गुंडाळून गरम करण्याची सवय टाळा. प्लॅस्टिक घटक मायक्रोव्हेवमध्ये गरम होऊन कॅन्सरजन्य घटकांची निर्मिती वाढवू शकतात. 


बीपीए फ्री डबे, भांडी तसेच मायक्रोव्हेवमध्ये सुरक्षित राहतील अशाच भांड्यांची निवड करा. 


पदार्थ अति गरम करू नका. आवश्यक असलेल्या तापमानात आणि वेळेतच मायक्रोव्हेवचं सेटिंग करा.