White Hair: ऐन तारुण्यात केस पांढरे होत आहेत? आजच `या` चार सवयी सोडा
White Hair Problem: कोणत्याही व्यक्तीला अकाली केस पांढरे होणं आवडणार नाही. मात्र अनेकदा काळजी घेऊनही चुकीच्या सवयी यासाठी कारणीभूत ठरतात. चला जाणून घेऊयात कोणत्या सवयींमुळे केसांचं नुकसान होतं.
White Hair At Early Age: केसामुळे सौंदर्य अधिक खुलतं. त्यामुळे चेहऱ्याच्या ठेवणीसोबतच केसांची काळजी घेणं आवश्यक आहे. पण ऐन तारुण्यात केस गळती आणि पांढरे होण्याचं प्रमाण गेल्या काही दिवसात वाढलं आहे. त्यामुळे अनेकांना चिंता, लाज वाटते, त्यासोबत आत्मविश्वासही खालावतो. पांढऱ्या केसामुळे तर केस असूनही अकाली वृद्धत्व आल्याचं वाटतं. त्यामुळे लोकं केमिकलयुक्त हेअर डायने पांढरे केस काळे करण्याचा प्रयत्न करतात. मात्र यामुळे केसांचं नुकसान होण्याची शक्यता असते. जर ऐन तारुण्यात केस पांढरे होण्यास सुरुवात झाली असेल तर काही चुकीच्या सवयी बदलल्या तर फायदा होऊ शकतो. चला तर जाणून घेऊयात या सवयी कोणत्या आहेत.
1. जंक फूड- जर तुम्हाला घराच्या खाण्याऐवजी बाहेरचं खाणं पसंत असेल तर तुम्हाला ही सवय आजच बदलावी लागेल. या खाण्यामध्ये तेलाची मात्रा अधिक असल्याने कोलेस्ट्रोल, ब्लड शुगर वाढतं. त्यामुळे त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे केसांवर विपरीत परिणाम होतो. आहारात कॅल्शियम, झिंक, आयर्न, कॉपर, प्रोटीन आणि विटामिन असलेल्या पदार्थांना महत्त्व द्या.
2. गरजेपेक्षा जास्त चिंता नको- आजकाळ कमी वयातच अभ्यास आणि नोकरीचा चिंता सतावत असते. त्यामुळे डोक्यावर विनाकारण टेन्शन वाढतं. त्याचा परिणाम पूर्ण शरीरावर होतो. यामुळे केस लवकर पांढरे होतात. त्यामुळे आनंदी जीवन जगण्यावर जोर दिला पाहीजे.
बातमी वाचा- Health News: नाकातील ही समस्या ठरू शकते जीवघेणी! दुर्लक्ष केल्यास करावी लागेल शस्त्रक्रिया
3. सिगरेट आणि दारू- जर सिगारेट आणि दारूचं व्यसन असेल तर लवकरच सोडा. कारण यामुळे लिव्हर आणि लंग्सवर परिणाम होतो. त्याचबरोबर त्याचा विपरीत परिणाम केसांवर होतो आणि पांढरे होतात. स्कॅल्पवर परिणाम झाल्याने ब्लड सर्कुलेशन होत नाही आणि केस पांढरे होतात.
4. व्यायाम- उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे. यासाठी आळस सोडून व्यायाम करणं गरजेचं आहे. यामुळे ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित राहतं आणि अकाली केस पांढरे होत नाहीत.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)