Health News: नाकातील ही समस्या ठरू शकते जीवघेणी! दुर्लक्ष केल्यास करावी लागेल शस्त्रक्रिया

Health News: हिवाळ्याचे दिवस सुरु असून सर्दी खोकल्याचा त्रास होऊ शकतो. असं असलं तरी याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. आज आम्ही तुम्हाला याबाबत काही उपाय सांगणार आहोत. 

Dec 05, 2022, 16:10 PM IST
1/5

sinuses infection

आज आपण नाकातील काही समस्यांबद्दल सांगणार आहोत. मात्र याबाबत अनेकांना सहसा माहित नसतं. ठरावीक कालावधीनंतर एक मोठी समस्या होऊ शकते.

2/5

sinuses infection

हिवाळ्यात नाक वाहण्यासोबतच नाकाला सूज येते. जर तुमच्यासोबतही असे होत असेल तर ते फंगल इन्फेक्शन असू शकते. वैद्यकीय परिभाषेत फंगल सायनुसायटिस म्हणतात. यावर योग्य वेळी उपचार न केल्यास ते प्राणघातकही ठरू शकते. 

3/5

sinuses infection

नाकातील वास घेण्याची क्षमता कमी होते. नाक वाहण्याबरोबरच तापही येतो. जळजळ होऊन नाक लाल होते. नाक बंद होणे, नाक दुखीचा त्रास होतो. त्याचबरोबर चेहऱ्यावर कोरडेपणा आणि वेदनेसह लाल डोळे दिसतात.

4/5

sinuses infection

सायनस संसर्गाची लक्षणे आढळल्यास, आपण ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सामान्यत: या बुरशीविरोधी औषधांनी बरा होतो, परंतु साध्या औषधांनी हा त्रास कमी होत नसेल तर कॉर्टिकोस्टेरॉइड औषध दिले जाते. शेवटी शस्त्रक्रियेचा पर्याय आहे. तत्पूर्वी डॉक्टर नझल वॉसद्वारे नाक साफ करण्याचा प्रयत्न करतात.

5/5

sinuses infection

सायनस कवटीच्या आतील एक पोकळी आहे . ही पोकळी आतून कपाळापर्यंत पसरलेली असते. हे नाकाच्या मागे, डोळ्यांच्या मध्यभागी आणि गालाच्या वरच्या भागाच्या हाडाखाली असते. जेव्हा कोणत्याही बॅक्टेरियाचा पसरतो तेव्हा सायनसमध्ये गोठू लागतो. ते वेळोवेळी साफ करणं आवश्यक आहे. तसं न केल्यास सूज येते आणि सायनस योग्यरित्या कार्य करत नाहीत.