Sex Addiction : सेक्स एडिक्शन (Sex Addiction) ही आता सामन्य गोष्ट आहे. मुळात या गोष्टीला सेक्स एडिक्शन हे तुमच्या नात्याला किंवा आयुष्याला पूर्णपणे बर्बाद करू शकतं. या एका गोष्टीमुळे अनेकदा लोकं तुमच्यापासून दूर होऊ लागतात. ज्यावेळी तुम्ही सतत सेक्सचा (Sex) विचार करत असता तेव्हा आयुष्यातील इतर सर्व गोष्टी मागे टाकत ही एक गोष्ट गरज बनते. अशावेळी व्यक्तीला सामान्य जीवन जगणंही अत्यंत कठीण होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेक्स एडिक्ट (Sex Addict) झालेल्या व्यक्ती, ही गोष्ट नाकारतात की त्यांना अशी काही समस्या आहे. मात्र अशा व्यक्तींना या समस्येसाठी मानसिक सल्ला (Mental Treatment) किंवा उपचार घेणं आवश्यक आहे. तुमचा पार्टनर देखील या समस्येचा बळी पडला नाहीये ना हे ओळखण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सामान्य गोष्टी सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही पार्टनर सेक्स एडिक्टेड आहे की नाही हे ओळखू शकता.


तुमच्यासोबत पुरेसे संबंध ठेवत नाही


सेक्स एडिक्ट त्यांच्या पार्टनरवर विश्वास देण्याचा प्रयत्न करतात की, ते त्यांच्यासोबत पुरेसे शारीरिक संबंध ठेवत नाहीत. सेक्स एडिक्ट व्यक्ती त्यांच्या पार्टनरचा यावर विश्वास ठेवण्यासाठी खोट्या गोष्टींचा अवलंब करतात. या व्यक्तींच्या मनात भीती असते की, नात्यामध्ये जवळीक आणि लैंगिक संबंध नसल्यामुळे नाते तुटू शकतं.


जोपर्यंत निदान होत नाही तोपर्यंत ही गंभीर स्थिती नाही


सेक्स एडिक्ट व्यक्ती असं म्हणतात की, त्यांच्या या परिस्थितीचं वैद्यकीय निदान आणि उपचार होईपर्यंत कोणी त्यांच्यावर सेक्स एडिक्ट असल्याचा आरोप करू शकत नाही. या गोष्टीवरून ते कोणाही व्यक्तीशी वाद घालण्यासाठी तयार असतात. निदान होत नाही तोवर ही गंभीर परिस्थिती नाही असं ते मानतात.


पॉर्न पाहणं गुन्हा नाही


सेक्स एडिक्टनचं एक मोठं लक्षण म्हणजे जास्त प्रमाणात पॉर्न पाहणं किंवा त्याचं व्यसन असणं. सेक्स एडिक्ट व्यक्ती असा तर्क काढतात की, पॉर्न पाहणं ही मोठी गोष्ट नाही. सेक्‍शुअल फँटसीला पूर्ण करण्यासाठी तसंच संतुष्ट होण्यासाठी पोर्न पाहणं हा एक सोपा मार्ग आहे. शिवाय ही गोष्ट प्रत्येकजण करतो.