2 डोसनंतरही विमानाने प्रवास करण्यासाठी `हा` नियम पाळणं गरजेचं
महाराष्ट्र सरकारने इतर देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन नियम जाहीर केला आहे.
मुंबई : कोरोनाची प्रकरण वाढताना दिसतायत. सध्या केरळ आणि महाराष्ट्रात जास्तीत जास्त प्रकरणं नोंदवली जातायत. एकीकडे, केरळमध्ये तीस हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत, तर महाराष्ट्रात सात हजारांहून अधिक प्रकरणांची सतत नोंद होताना दिसतेय. आता ही परिस्थिती पाहता महाराष्ट्र सरकारने इतर देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन नियम जाहीर केला आहे.
मुंबईतील आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी कठोर निर्णय
राज्य सरकारच्या वतीने असे सांगण्यात आलं आहे की, आता जो कोणी दुसऱ्या देशातून मुंबईत आलं तर त्यांना त्यांच्यासाठी कोरोनाचा आरटी पीसीआर अहवाल त्यांच्यासोबत ठेवणं बंधनकारक असणार आहे. अन्यथा, राज्यात प्रवेश दिला जाणार नाही.
मुख्य म्हणजे हे देखील स्पष्ट केलं गेले आहे की, आता लसीचे दोन्ही डोस लागू केल्यानंतरही आरटी-पीसीआर अहवाल दाखवावा लागेल. अशा परिस्थितीत आता जुने नियमही अधिक कडक केले गेलेत आणि प्रत्येकाला त्यांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
मध्य पूर्व, युरोप आणि दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांनाही नवीन नियम लागू होतील, असंही या आदेशात म्हटलं आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीनर ही योग्य ती काळजी घेतली जात आहे.
दोन आठवड्यांपूर्वी राज्य सरकारकडून आदेशही जारी करण्यात आला होता. त्या आदेशानुसार, प्रवाशांना महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी लसीचे प्रमाणपत्र दाखवणं आवश्यक असेल. तसंच व्यक्तींनी दोन्ही लसींचे डोस घेतलेले असणं आवश्यक असणार आहे. याशिवाय दुसरी लस घेऊन 14 दिवस होऊन पूर्ण झाले असणं बंधनकारक असेल.