मुंबई : स्वयंपाक घरात कडिपत्ता हा नेहमी वापरला जाणार घटक आहे. पदार्थाला एक विशेष चव आणण्याखेरीज कडिपत्त्याचे अनेक फायदेही आहेत. हे छोटंसं दिसणारं पान अतिशय गुणकारी आणि आरोग्यदायी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कडिपत्ता हे लोह आणि फॉलिक अॅसिडचा मोठा स्त्रोत आहे. कडिपत्ता एनिमिया आजार रोखण्यासही मदत करतो.


अतिशय मद्यपान करणाऱ्या लोकांच्या जेवणात कडिपत्त्याचा वापर करणं फायदेशीर ठरतं. मद्यपानामुळे शरीरात ऑक्सिडेटिव स्ट्रेस आणि टॉक्सिन्स तयार होत असतात. जेवणात कडिपत्त्याचा वापर फायदेशीर ठरतो.


'जर्नल ऑफ प्लांट फूड फॉर न्यूट्रिशन'च्या अभ्यासानुसार, कडिपत्त्यामध्ये फायबर असतं. ते रक्तातील इन्सुलिनला प्रभावित करुन ब्लड-शुगर लेवल कमी करण्याचं काम करतं. 


कडिपत्ता पचनशक्ती सुरळित करतो. वजन कमी करण्यासाठीही कडिपत्ता फायदेशीर आहे. 


मधुमेह आणि सतत वजन वाढणाऱ्या लोकांसाठी कडिपत्ता खाणं अतिशय गुणकारी आहे.


कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी कडिपत्ता प्रमुख भूमिका बजावतो. 


केसांच्या गळतीवरही कडिपत्ता उत्तम उपाय आहे. तेलात कडिपत्त्यांची पानं उकळवून ते तेल केसांना लावल्याने केस गळती कमी होण्यासही मदत होते.