मुंबई : नवरात्री उत्सवाचा आज चौथा दिवस. या दिवसांमध्ये देवीची मनोभावे पूजाअर्चा केली जाते. त्याचप्रमाणे अनेक या काळात उपवास करतात. पण आताच्या धकाधकीच्या जीवनात हे उपवास जरा जिकरीचंच आहे. त्यामुळे आरोग्य संभाळून उपवास करणं गरजेचं आहे. उपवासा दरम्यान खाणं टाळणं आरोग्यास कदाचीत घातक देखील ठरू शकेल त्यासाठी काही उपाय केल्यास ते आरोग्यास लाभदायक ठरू शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- दिवसाची सुरवात ग्रीन टी आणि दोन खजूराने करा.


- नाश्त्याच्यावेळी काही सुकामेव्याचे दाणे, किसमिस तोंडात टाका.


- दुपारच्या वेळेत मिल्कशेक किंवा नारळाचे पाणी आवर्जून प्या.


- सोबतीला जेवायच्या वेळेत साबूदाणा खिचडी, राजगिर्‍याचे थालीपीठ असे हलके पदार्थ आणि छास प्या. थोड्यावेळाने भूक लागल्यास फळं खावीत.


- संध्याकाळच्या वेळेत तुम्ही आलू चाट खाऊ शकता.


- रात्रीच्या जेवणात व्हेजिटेबल सूप, सलाड, भोपळा घालून केलेली थालीपीठ खाऊ शकता.


- रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर दूध नक्की प्या.


- उपवासाच्या दिवसात फळं खाणं हा उत्तम पर्याय आहे. त्यामध्ये व्हिटामिन, मिनरल्स, फायबर्स आणि नैसर्गिक स्वरूपातील साखर असते.