पावसात हमखास उद्भवते हि समस्या ..वेळीच करा उपाय..नाहीतर.....
अंघोळ केल्याने पावसाच्या पाण्यातील काही विषाणू तुमच्या त्वचेवरून निघून जाण्यास मदत होईल.
मुंबई: पावसाळ्यातील ,ह्युमिडिटीमुळे येणारा घाम आणि पावसाचं पाणी यामुळे त्वचेवर पुरळ आणि खाज येण्याची समस्या उद्भवू शकते. अशा या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी डॉकटरकडे जाण्याची गरज नाहीये घरच्या घरी काही उपाय करूनसुद्धा आपण यावर उपाय करू शकतो
पावसाळ्यात अनेक आजारही येतात. पावसाळ्यातील आर्द्रतेमुळे घाम आणि पावसाच्या पाण्यामुळे त्वचेवर पुरळ आणि खाज येण्याची समस्या उद्भवूते. अशा परिस्थितीत या समस्येपासून मुक्त होण्यासाठी काही नैसर्गिक आणि घरगुती उपायांची मदत घेतली जाऊ शकते.
पावसाळ्यात त्वचेच्या खाज येत असेल तर, हे घरगुती उपाय त्वरित आराम देतील.
लिंबू आणि बेकिंग सोडा-
पावसाळ्यात त्वचेला खाज सुटत असताना आंघोळ करताना एका भांड्यात दोन चमचे बेकिंग सोडा आणि एक चमचा लिंबू पाणी घालून पेस्ट बनवा. ते तुमच्या त्वचेवर चांगले लावा आणि 5-10 मिनिटांनंतर धुवा. हे दररोज एकदा करा.नक्की आराम मिळेल.
चंदन पेस्ट-
त्वचेवर चंदनाचा वापर करणे खूप फायदेशीर मानले जाते. हा उपाय करण्यासाठी बाजारात मिळणारी चंदन पावडर गुलाब पाण्यात मिसळून खाज येणा-या भागावर लावा. असे नियमित केल्याने खाज येण्याच्या समस्येपासून आराम मिळेल.
कडुनिंबाचे उपयोग-
खाज येण्याची समस्या दूर करण्यासाठीही कडुलिंबाचा वापर केला जाऊ शकतो. कडुनिंबामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे त्वचेच्या समस्या दूर करण्यास मदत करतात. खाज सुटण्यापासून आराम मिळवण्यासाठी कडुलिंबाची पाने बारीक करून खाज येणा-या भागावर लावा.
खोबरेल तेल-
खोबरेल तेलामध्ये असलेल्या अँटी-इंफ्लेमेशन आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे ते त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. नारळाचे तेल त्वचेला मॉइश्चरायझिंग करण्यासाठी तसेच त्वचेचे संक्रमण दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. पावसाळ्यात खाज सुटत असेल तर बाधित भागावर खोबरेल तेल लावावे.
जेव्हा केव्हा पावसात भिजालं तेव्हा घरी येऊन स्वच्छ पाण्याने अंघोळ करायला विसरू नका ,अंघोळ केल्याने पावसाच्या पाण्यातील काही विषाणू तुमच्या त्वचेवरून निघून जाण्यास मदत होईल.