नवजात बालकाला कावीळ झाली? घाबरून न जाता नेमकं काय करावं पाहा...
jaundice in newborn causes symptoms : दहापैकी सात नवजात बालकांना जन्माननंतर लगेचच काविळीची लागण झाल्याच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील.
jaundice in newborn causes symptoms : बाळ जन्माला आल्यानंतर त्याचं आरोग्य, वजन आणि इतर अनेक लहानसहान गोष्टींची काळजी घेतली जाते. पण, बाळाच्या आरोग्याच्या बऱ्याच गोष्टी अशाही असतात ज्या कोणाच्याही हातात नसतात. नवजात शिशूंमध्ये सर्वाधिक आढळणारा आजारपणाचा प्रकार म्हणजे कावीळ. अनेक नवजात बालकांना जन्मानंतर काही दिवसांनी किंवा काही तासांनीसुद्धा काविळीची लागण होते. ज्यामुळं पालकांची चिंता वाढते.
नवजात बालकांमध्ये कावीळ होण्याचं प्रमाण सर्वसामान्य असलं तरीही या व्याधीची लक्षणं शोधून त्यावर वेळीच उपचार केलं जाणंही तितकंच महत्त्वाचं आहे. अनेकदा ही कावीळ आपोआपही कमी होते. पण, वेळीच योग्य उपचार घेण्याचाच सल्ला डॉक्टरही देतात.
नवजात बालकांना कावीळ होण्याची कारणं...
निर्धारित वेळेआधीची प्रसूती
आई आणि बाळाचा रक्तगट वेगळा असणं
स्तनपानाशी निगडीत कावीळ
ग्लुकोज 6 फॉस्फेटची कमतरता
यकृताचे आजार
अनुवंशिकता, दुर्मिळ आजार
वरील कारणांव्यतिरिक्त फिजीओलॉजिकल कावीळ बाळाच्या जन्मानंतर 24 तासांत आपोआपच बरी होण्यास सुरुवात होते.
बाळाला कावीळ झाली हे ओळखण्यासाठी काही प्राथमिक लक्षणांवर पालकांनी लक्ष देणं अपेक्षित असतं. बाळाची त्वचा पिवळी होणं, गडद पिवळी लघवी होणं, शौचास पांढरे होणे अशी लक्षणं काविळीच्या वेळी दिसून येतात.
बालकांमध्ये अशी लक्षणं दिसल्यास किंवा त्यांची त्वचा पावळसर दिसल्यास तात्काळ पालकांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सुरुवातीला घरीच उपचार करणं टाळावं.
हेसुद्धा वाचा : मास्क वापरा! मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळं यंत्रणाकडून सावधगिरीचा इशारा
तुमच्या नवजात बालकाला कावीळ झाल्यास त्याला स्तनपान करा, जेणेकरून बाळाच्या शरीरातील रक्तप्रवाह वाढून बिलीरुबिन मलमूत्रावाटे शरीराबाहेर पडेल. याशिवाय स्तनदा मातांनी स्वत:च्या आहाराचीही काळजी घ्यावी.
बाळाला स्तनपान करणाऱ्या मातांनी त्यांच्या आहारात ताजं, पौष्टीक आणि संतुलित भोजन ग्रहण करावं. पालेभाज्या, आरोग्यदायी स्निग्ध घटक असणारे पदार्थ, पुरेशी फळं आणि तंतूमय पदार्थांचा आहारात समावेश करावा. बाळाला रोज किमान अर्धा ते एक तासासाठी कोवळ्या सूर्यरप्रकाशात न्यावं, बाळाला नियमित मालिश करावी.
(कोणताही वैद्यकिय निर्णय घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)