Joint Pain Removal Remedy in marathi : युरिक अ‍ॅसिडची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बदलेल्या कामाची शैली, जीवनमान आणि खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे युरिक अ‍ॅसिडची समस्या अनेकांना होतेय.  युरिक अ‍ॅसिडमुळे सांध्यांना दुखणं, सूज येणे यासारख्या समस्या त्रासदायक ठरतात. आरोग्य तज्ज्ञांनुसार शरीरात युरिक अ‍ॅसिड वाढण्यामागे अनेक कारणं असतात. त्यामुळे युरिक अ‍ॅसिड नियंत्रित ठेवण्यासाठी आणि कमी करण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहे. आज आम्ही तुम्हाला अशा दोन बियाचं पाणी सांगणार आहोत. ज्यामुळे युरिक अ‍ॅसिडवर तुम्ही मात करु शकता. (Joint Pain Removal Remedy These 2 seeds destroy uric acid drink their water on an empty stomach in the morning to keep kidneys healthy)


युरिक अ‍ॅसिड म्हणजे नेमकं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोग्य तज्ज्ञांनुसार युरिक अ‍ॅसिड हे एक प्रकारचे रसायन असतं. जे शरीरातील प्युरिनच्या विघटनानने तयार होत असतं. प्युरीन्स सामान्यतः पदार्थांमध्ये आपल्याला आढळून येतं. याचा उपयोग शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी होतो. मात्र, जेव्हा शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण जास्त होते आणि ते रक्तात जमा होते त्यामुळे आपल्याला आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. सांधे दुखणे, सूज येणे, सांधे लाल होणे या सारखी लक्षणं दिसून येतात. 


या बिया तुम्हाला ठरतील मदतगार!


युरिक अ‍ॅसिडसाठी अळशीच्या बिया या उपयुक्त ठरतात. या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि फायबर भरपूर प्रमाणात आढळते. याचा उपयोग सूज कमी करण्यास होतो. हे युरिक ऍसिडचे वाढलेले स्तर नियंत्रित करण्यास देखील मदत होते. 


हेसुद्धा वाचा - 'हे' शक्तिशाली धान्य रोज उकळून खा! रक्तवाहिन्यांमधील Cholesterol घटवण्यास करेल मदत


चिया बियाणे


चिया बियांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरचे प्रमाण जास्त आढळून येतं. या बिया शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतं आणि यूरिक ऍसिड नियंत्रित ठेवण्यास फायदेशीर ठरतं. 


या बियांचे सेवन कसे करावे?


आता या बियांचं सेवन कसं करावं हे समजून घ्या. एक चमचा फ्लॅक्ससीड आणि दोन चमचे चिया सिड्स रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी उठून दाणे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. आता याचं सेवन करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते फ्रूट स्मूदीमध्ये मिक्स करुन त्याच सेवन करु शकता.


(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)