रात्रीच्या जेवणानंतर फक्त 10 मिनिटं करा हे काम, अनेक आजारांपासून होईल सुटका
ऑफिसमध्ये दिवसभर काम केल्यानंतर रात्री घरी येतो आणि जेवण करून थेट बेडरूममध्ये झोपतो. पण ही सवय आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे
Health Tips: धावपळीच्या युगात आपल्याकडून भरपूर चुका होतात. चुकीच्या सवयींमुळे आपल्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. ऑफिसमध्ये दिवसभर काम केल्यानंतर रात्री घरी येतो आणि जेवण करून थेट बेडरूममध्ये झोपतो. पण ही सवय आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. निरोगी राहण्यासाठी अन्नाचं व्यवस्थितरित्या पचन होणं आवश्यक आहे. अन्यथा अनेक घातक आजार होऊ शकतात. त्यामुळे रात्रीचे जेवण झाल्यावर किमान 10 मिनिटे चालावे. तुम्ही रोज व्यायाम करत नसला तरी 10 मिनिटांचे चालणे तुम्हाला निरोगी ठेवू शकते. रात्रीच्या जेवणानंतर फेरफटका मारल्याने तुम्ही तंदुरुस्त राहाल तसेच इतर अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
व्यवस्थित पचन होतं: दररोज चालण्याने पचनशक्ती सुधारते, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. रात्रीच्या जेवणानंतर फेरफटका मारल्याने शरीरात गॅस्ट्रिक एन्झाईम्स बनण्यास मदत होते. यामुळे पचनास मदत होते. रोज रात्रीचे जेवण घेतल्यानंतर 10 मिनिटं चालल्यास बद्धकोष्ठतेसारखे आजार टाळता येतात.
मेटाबॉलिझ्म बूस्ट होतं: रात्रीच्या जेवणानंतर चालण्याने शरीरातील कॅलरीज बर्न होतात. यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते आणि तुम्ही तंदुरुस्त राहता. यामुळे चयापचय गतिमान राहते. याशिवाय रात्री चालल्यावर चांगली झोप लागते.
तणाव दूर होतो: रात्रीच्या जेवणानंतर शतपावली केल्याने शारीरिक समस्या तर दूर होतातच, पण मानसिक ताणही दूर होतो. चालण्याने एंडोर्फिन सोडण्यास देखील मदत होते. रात्रीच्या जेवणानंतर थोडं चाललं तर फ्रेश वाटतं.
रोगांशी लढण्याची क्षमता वाढते: रात्री जेवल्यानंतर फेरफटका मारल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. त्यामुळे शरीराचे अवयव व्यवस्थित काम करू लागतात. यासोबतच शरीरात अँटीबॉडीज तयार होतात आणि रोगांशी लढण्याची क्षमता वाढते. म्हणजेच रात्रीच्या जेवणानंतर दररोज चालत राहिल्यास संसर्गजन्य आजार टाळता येऊ शकतात.