तुमच्या आरोग्याचा शत्रू `कच्चा बदाम`, त्यापासून शरीरीला होतात गंभीर तोटे
बदाम अनेक प्रकारे खाल्ले जातात. बहुतेक लोकांना भिजवलेले बदाम खायला आवडतात.
मुंबई : बदाम हे जगभरातील सर्वाधिक आवडते ड्रायफ्रुट आहे. बदाम पौष्टिक आहेत आणि सामान्यतः या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. बदाम हे प्रथिने, फायबर आणि ओमेगा 3 सारख्या पोषक तत्वांचे भांडार आहे. बदाम देखील व्हिटॅमिन ईचा एक चांगला स्रोत आहे, जो तुमच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतो. जर आपण बदामाच्या पोषक तत्वांबद्दल बोललो तर बदामामध्ये कॅल्शियम, लोह, झिंक आणि मॅग्नेशियम सारखे पोषक घटक देखील आढळतात, जे शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आवश्यक असतात.
अभ्यासानुसार, बदामामध्ये विविध प्रकारचे पोषक घटक आढळतात, ज्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि फायबर इत्यादींचा समावेश होतो. फक्त मूठभर बदामात माणसाच्या रोजच्या प्रथिनांच्या गरजांना पूर्ण करतो.
बदाम अनेक प्रकारे खाल्ले जातात. बहुतेक लोकांना भिजवलेले बदाम खायला आवडतात. असे मानले जाते की, भिजवलेल्या बदामातील पोषक तत्व शरीराद्वारे सहजपणे शोषले जातात. याशिवाय बदामाचा वापर मिठाई आणि स्मूदीच्या रूपातही करता येतो. तज्ज्ञांचे मत आहे की बदाम वेगवेगळ्या प्रकारे खाल्ल्याने त्याचे आरोग्य फायदेही वाढतात.
मात्र, तुम्ही कच्चे बदाम खाणे टाळावे. कच्च्या बदामांमुळे आरोग्याला अनेक गंभीर हानी होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. कसं ते जाणून घेऊया-
बदाम दोन प्रकारचे असतात, कडू किंवा कच्चे बदाम आणि गोड बदाम. गोड बदामांना किंचित गोड चव असते आणि तेच असतात जे तुम्हाला सहसा बाजारातून मिळतात. कडू बदामाला खूप कडू चव असते. त्याची सर्वत्र लागवड केली जाते. कडू बदामाची पेस्ट किंवा अर्क तयार करण्यासाठी वापरला जातो. कडू बदामामध्ये अमिग्डालिन कंपाऊंड असते, जे त्याला कडू चव देते.
कडू बदामामध्ये ग्लायकोसाइड अमिग्डालिन नावाचे विष असते, ज्यामध्ये हायड्रोजन सायनाइडचा समावेश होतो, ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो. एका अभ्यासात असे दिसून आले आहे. की 6-10 कच्चे कडू बदाम खाल्ल्याने प्रौढ व्यक्तीमध्ये गंभीर विषबाधा होऊ शकते, तर 50 किंवा त्याहून अधिक सेवन केल्यास मृत्यू होऊ शकतो.
मुलांमध्ये किंवा प्रौढांमध्ये असेच घातक परिणाम होण्याची शक्यता असते. कडू बदामाचे नेमके प्रमाण निश्चित करण्यासाठी अधिक अभ्यासाची आवश्यकता असली तरी, कडू बदाम टाळणेच योग्य आहे, असे तज्ञ मान्य करतात. बदामाला मोड आल्याने तुमच्या शरीराला त्यामध्ये असलेले पोषकद्रव्ये अधिक सहजपणे शोषण्यास मदत होते.
अभ्यास सुचवितो की कच्चे बदाम खाल्ल्याने शरीरात मायकोटॉक्सिन, विषारी संयुगे निर्माण होतात, जे विविध आरोग्य समस्यांशी निगडीत असतात, ज्यामुळे पाचन विकार आणि यकृतातील ट्यूमरचा धोका वाढू शकतो.
मात्र, गोड बदामात अमिग्डालिनचे प्रमाण कमी असते. असे मानले जाते की, गोड बदामामध्ये या कंपाऊंडची सामग्री कडू बदामापेक्षा 1 हजार पट कमी आहे. हायड्रोजन सायनाईडची धोकादायक मात्रा तयार करण्यासाठी एवढी कमी प्रमाणात अमिग्डालिन अपुरी आहे. परिणामी, गोड बदाम खाण्यास सुरक्षित मानले जातात.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमान करत नाही.)