ओमायक्रॉन चिंता वाढवतोय; ही 5 Medical Gadgets ठेवा घरी
आज आम्ही तुम्हाला अशा काही मेडिकल गॅजेट्सची माहिती देणार आहोत ज्यांची तुम्हाला या कठीण काळात गरज भासू शकते.
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता तिसरी लाट आली असल्याची चर्चा सुरु आहे. अशातच कोरोनचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन व्हेरिएंटने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. सध्याच्या घडीला देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 1431 इतकी पोहोचली आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा काही मेडिकल गॅजेट्सची माहिती देणार आहोत ज्यांची तुम्हाला या कठीण काळात गरज भासू शकते.
कॉन्टक्टलेस थर्मामीटर
हे असे थर्मामीटर आहे की त्याला तोंडात ठेवण्याची किंवा काखेत ठेवण्याची गरज नाही. या थर्मामीटरद्वारे संपर्क न करताही तापमान तपासलं जाऊ शकतं.
पल्स ऑक्सिमीटर
कोविडच्या या काळात ऑक्सिमीटर हे अत्यावश्यक गॅजेट बनले आहे. तुमच्या रक्तातील ऑक्सिजन आणि पल्स रेट मोजणारं हे उपकरण 500 ते 2500 रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहे.
डिजिटल ब्लड प्रेशर मॉनिटर
हे बीपी मोजण्याचं यंत्र कोणत्याही त्रासाशिवाय समोरच्या व्यक्तीचा रक्तदाब मोजण्यास मदत करतं. हे उपकरण जवळपास 3 हजार रुपयांना खरेदी करू शकता.
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर
कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर लोकांमध्ये ऑक्सिजनची कमतरता दिसून येते. अशा परिस्थितीत, तुमच्या घरात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर असणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही ते ऑनलाइन किंव ऑफलाइन दोन्ही पद्धतीने खरेदी करू शकता
यूवी स्टरीलायजर
वेगवेगळ्या आकारात येणाऱ्या या डिव्हाइसमध्ये तुम्ही तुमचे स्मार्टफोन आणि इतर गॅजेट्स ठेवू शकता. जेणेकरून ते निर्जंतुक होऊ शकतील. हे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणी तुम्हाला खरेदीसाठी मिळेल.