मुंबई : रेफ्रिजरेटरचा वापर प्रामुख्याने अन्न टिकवण्यासाठी केला जातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण ब्युटी प्रोड्क्ट्सदेखील दीर्घकाळ टिकण्यासाठी आणि उत्तम स्थितीत ठेवण्यासाठी ती इतरत्र ठेवण्याऐवजी फ्रीजमध्ये ठेवण्याचा सल्ला ब्युटी एक्सपर्टने दिले आहे. 


फेशिएल मास्क - चेहरा तजेलदार करण्यासाठी अनेकदा घरगुती फेशिएल मास्कचा वापर केला जातो. मात्र ते वापरल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवावेत.  त्वचेवरील लालसरपणा आटोक्यात ठेवण्यासाठी थंडगार मास्क अधिक प्रभावी ठरतो. 


लिपस्टिक आणि लीप बाम -  अनेकांच्या लीपस्टिक आणि लीप बाम बॅगेमध्येच पडून राहिल्याने विरघळल्याचे पाहिले असेल. लिपस्टिक खराब किंवा मेल्ट होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवावी.  


आयलायनर पेन्सिल - पेन्सिल टोकधार बनवण्यासाठी ती फ्रीजमध्ये ठेवा. दहा मिनिटांनंतर शार्प करा यामुळे ती अधिक झटपट आणि योग्यप्रकारे होईल. 


नॅचरल प्रोडक्ट्स - कॉस्मॅटिकमध्ये तुम्ही कोणत्याही नॅचरल प्रोडक्टचा  वापर करत असल्यास ते पहिल्यांदा वापरल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा. असे केल्यास ते अधिक उत्तम स्थितीत राहतील तसेच त्यामध्ये बॅक्टेरिया वाढणार नाहीत. 


परफ्युम - परफ्यूम अधिक काळ टिकण्यासाठी आणि उष्णता तसेच सूर्यप्रकाशामुळे त्याचे होणारे नुकसान टाळण्यासाठी परफ्यूमदेखील फ्रीजमध्ये ठेवा.