Doctor`s Day : KEM रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ हेमंत देशमुख सांगतायत कोविड योद्धांची कहाणी
आज जागतिक डॉक्टर दिन म्हणजे डॉक्टरांचा दिवस
मुंबई : आज 1 जुलै...म्हणजेच जागतिक डॉक्टर दिन...सध्या कोरोनाच्या संकटकाळात स्वतःच्या जीवाचीही परवा न करता देशभरातील डॉक्टरांनी रूग्णांची अविरतपणे सेवा केली आहे. अहोरात्र झटणाऱ्या या डॉक्टरांना झी 24 तासचा सलाम करतं. तर आज डॉक्टर्स डे च्या निमित्ताने मुंबईतील केईएम रूग्णालयातचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांच्याशी खास बातचीत केली आहे.
डॉ. देशमुख यांनी कोरोनाच्या काळातील आव्हानांबाबत सांगितलंय. या काळात डॉक्टरांनी रूग्ण कसा बरा होईल यासाठी एका टीमने आणि जिद्दीने केलेल्या कामाविषयी माहिती दिली आहे. याशिवाय डॉक्टरांवर होणारे हल्ल्यांची गंभीर दखल घेतली पाहिजे असंही म्हटलंय. कोरोनाच्या परिस्थितीत झटणाऱ्या या डॉक्टरांना थँक्यू डॉक्टर...