Mumps : सावधान! गालगुंडची साथ वाढतेय, दिवसभरात 190 रुग्ण, पाहा लक्षणे आणि उपचार
Health Tips In Marathi : दिवसेंदिवस वातावरणात होणारा बदल आणि जीवनशैली यामुळे आजारपणाचा धोका वाढतो. त्यातच हिवाळा असेल तर आणखीन संसर्गजन्य आजारांचा सामना करावा लागतो. जास्त करुन हिवाळ्यात गालगुंड हा आजार अनेकांना होतो. नेमंकी याची लक्षणे आणि उपचार काय आहेत जाणून घ्या...
Mumps Symptoms and Advisories in Marathi: गेल्या काही दिवसांपासून मम्प्स आजाराचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. हा एक संक्रमित आजार असून मम्प्स व्हायरसमुळे पसरतो. याला गालगुंड असेही म्हणतात. यामध्ये मुलांना त्वचेची समस्या उद्भवते. गालगुंड हा संसर्गजन्य रोग असून तो गालगुंडाच्या विषाणूमुळे होतो. हे पॅरामिक्सोव्हायरस नावाच्या विषाणूंच्या गटाशी संबंधित आहे. या आजाराने ग्रस्त लोकांमध्ये डोकेदुखी, ताप आणि थकवा यासारखी सौम्य लक्षणे दिसतात. सामान्यतः काही लाल ग्रंथींमध्ये (पॅरोटायटिस) तीव्र जळजळ होते. त्यामुळे गाल आणि जबडा सुजतो.
काही वर्षांपूर्वी हा एक गंभीर आजार होता. परंतु 1967 मध्ये लस उपलब्ध झाल्यानंतर रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली. तरी या आजाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण केरळमध्ये 10 मार्च रोजी एकाच दिवसात 190 रुग्ण आढळले. त्याच वेळी, केरळ आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, या महिन्यात व्हायरल संसर्गाची 2,505 प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि यावर्षी दोन महिन्यांत 11,467 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यानंतर आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राला या राज्यात सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. गालगुंड टाळण्यासाठी व्यक्तीने जागरुक असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे खूप वेगाने पसरतो. त्यामुळे डॉक्टरांकडून काळजी घेण्याचे आवाहन करतात.
वाढत्या प्रदूषणामुळे संसर्गजन्य आजार वाढत असल्याचे दिसून येत आहे. गालागुंड या आजारात कानात दुखणे आणि श्रवण कमी होणे अशी अनेकांची तक्रार असते. इतक्या लोकांना एवढा त्रास का झाला? त्यामुळे अनेकांना त्रास होतो. कानाचा त्रास सुरु झाल्यावर योग्य उपयोग करणे आवश्यक आहे. योग्य उपाय न केल्यास कायमचा बहिरेपणा येण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच सावध व्हा अन् या आजारावर उपचार करा.
गालगुंडाचा कोणाला धोका?
कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेले, आंतरराष्ट्रीय प्रवास करणारे, विषाणूविरूद्ध लसीकरण न केलेले आणि कॉलेज कॅम्पस सारख्या जवळच्या भागात राहणाऱ्यांना गालगुंडाचा त्रास होण्याचा धोका जास्त असतो.
ही आहेत लक्षणे
गळ्याखाली सूज येणे तसेच ताप येणे.
गालाच्या दोन्ही बाजूंना एकाच वेळी सूज येणे.
कानाला त्रास होणे.
अशी घ्या काळजी
गालगुंड झाल्यास गरम पाण्याचा शेक घ्या.
गालगुंडी जागी हलका मसाज करा. डॉक्टरांचा सल्ला घ्या. मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी.