मुंबई : एड्सबाबत जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या मनात प्रश्न कायम आहेत. कारण आजही लोकं या आजाराविषयी बोलण्यास कचरतात. या संकोचामुळे लोक एड्सशी संबंधित अनेक खोट्या गोष्टींना सत्य मानतात, त्यामुळे समाजात संभ्रम पसरतो. लोकं एड्सशी संबंधित लक्षणं ओळखत नाहीत, त्यांना या आजाराबद्दल नीट माहिती नसते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जागरूकतेच्या अभावामुळे आजही एड्सशी संबंधित अशा अनेक चुकीच्या समजुती आहेत. ज्याबद्दल लोकांना सत्य माहित असणं आवश्यक आहे. 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिवस साजरा केला जात आहे, म्हणून आज अशा 6 खोट्या गोष्टींबद्दल माहिती घेऊया ज्या लोकं खऱ्या मानतात.


समज- किस केल्याने AIDS पसरतो


तथ्य- एचआयव्ही पॉझिटिव्ह पीडितांच्या लाळेमध्ये या विषाणूचं प्रमाण खूपच कमी असतं. त्यामुळे किस केल्याने समोरच्या व्यक्तीमध्ये हा विषाणू पसरत नाही.


समज- पाण्यामार्फत HIV/AIDS पसरतो


तथ्य- एचआयव्ही पाण्याद्वारे इतर कोणालाही संक्रमित होत नाही. एचआयव्ही बाधित व्यक्तीच्या स्विमिंग पूलमध्ये आंघोळ केल्याने, त्याचे कपडे धुतल्याने आणि त्याचं उष्ट पाणी पिऊन हा विषाणू पसरत नाही. 


समज- टॅटू किंवा पियर्सिंगने HIV/AIDS होऊ शकतो


तथ्य- हे केवळ तेव्हाच शक्य आहे जर टॅटू किंवा पिअर्सिंग कलाकाराने एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तीवर वापरण्यात येणारी सुई साफ न करता वापरली. दरम्यान हे टाळण्यासाठी, प्रत्येक नवीन क्लायंटसाठी नवीन सुई वापरतात.


समज- मच्छर चावल्याने HIV/AIDS होतो


तथ्य- एचआयव्ही/एड्सग्रस्त व्यक्तीला डास चावल्यास, तो तुम्हाला चावला तरी विषाणू पसरत नाही. होय, डासांपासून इतर अनेक रोगांचा धोका आहे परंतु एचआयव्ही नाही.