Kitchen Hacks: नाश्त्यामध्ये काही वेगळं खायचंय? मग बनवा हे हेल्थी आणि टेस्टी पकोडे...
Kitchen Hacks: उपमा, सॅण्डविच (Sandwich) किंवा डोसा, इडली (Idali) खाऊनही आपण कंटाळतो. सारखं सारखं तेच तेच खाण्याचाही आपल्याला अनेकदा कंटाळा येतो. लोकं असाही विचार करतात की रात्रीच्या उरलेल्या खाण्याचं काहीतरी टेस्टी पण हेल्थी असं काहीतरी बनवलं पाहिजे.
Kitchen Hacks: आपल्याला नाश्त्याला रोज काय बनवायचं, असा प्रश्न (Breakfast) कायमच पडत असतो. नेहमीच आपण असा विचार करतो की आपण रोज करतो तो ब्रेकफास्ट टेस्टी आणि हेल्थी (Tasty and Healthy Breakfast) असावा. आपल्याला नेहमीच आपल्या ब्रेकफास्टसाठी पोहे, उपमा, सॅण्डविच (Sandwich) किंवा डोसा, इडली (Idali) खाऊनही आपण कंटाळतो. सारखं सारखं तेच तेच खाण्याचाही आपल्याला अनेकदा कंटाळा येतो. लोकं असाही विचार करतात की रात्रीच्या उरलेल्या खाण्याचं काहीतरी टेस्टी पण हेल्थी असं काहीतरी बनवलं पाहिजे. पण आपण कित्येकदा भूक (Starving) लागली म्हणून आपण अनेकदा आपल्या आरोग्याचा (Healthy) विचार न करता हाय कॅलरीचा नाश्ता करतो आणि त्यातून तेलकट आणि तूपकट खाण्याची आपल्याला सवय लागते. परंतु जास्त विचार न करता आपण पाहूया की तुम्ही हेल्थी आणि चविष्ट पदार्थ बनवू शकता. (kitchen hacks try to make these tasty and healthy pakode for your breakfast see the recipe)
सध्या आम्ही तुम्हाला अशाच एका पदार्थाबद्दल सांगणार आहोत जो वाचून तुमच्याही तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. हा पदार्थ अगदी सोप्पा आहे. तुम्ही तो कुठेही, कधीही आणि कसाही करू शकता. पोहे (poha) तर सगळ्यांच्याच घरी बनतात तेव्हा या पोह्यांचाच तुम्ही योग्य वापर करून टेस्टी आणि खमंग पोहे बनवू शकता. हा पदार्थ अगदी सोप्पा आणि सहज आहे. नाश्त्यात तुम्ही पोह्यांचे पकोडे (poha pakode) बनवू शकता. ही डिश सर्वात वेगळ्या पद्धतीचची असल्याच याची चवही तुम्हाला वेगळी मिळेल. त्यामुळे रोजरोज तेच तेच खायचा कंटाळा आलेल्यांना हा पदार्थ नक्कीच आवडेल. हे पोह्यांचे पकोडे पंजाबी स्टाईलचे (punjabi dish) आहेत. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया या पदार्थाची संपुर्ण कृती आणि साहित्य (Recipe) -
हेही वाचा - 14 वर्षाच्या शाळकरी पोराचे Instagram status पाहून का गाठावं लागलं Police Station?
पोहे पकोडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य -
- पोहे दीड वाटी
- उकडलेले बटाटे (3)
- हिरव्या मिरच्या (2)
- (2) चमचे हिरवे धणे
- अर्धा टीस्पून लाल तिखट
- अर्धा टीस्पून जिरे
- अर्धा टीस्पून साखर
- एक टीस्पून लिंबाचा रस
- एक टेबलस्पून तेल
- मीठ
पोहे पकोडे बनवण्याची कृती -
1. सर्व प्रथम पोहे घेऊन स्वच्छ करा आणि नंतर ते गाळणीत ठेवा व पाण्याने धुवा.
2. यानंतर पोहे भिजवून काही वेळ ठेवा. यानंतर बटाटे उकळून सोलून मॅश करून घ्या.
3. आता त्यात हिरव्या मिरच्या आणि हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घ्या.
4. आता एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये मॅश केलेले अश्रू आणि भिजवलेले पोहे घालून मिक्स करा.
5. आता या मिश्रणात लाल तिखट, जिरे, साखर, हिरवी मिरची आणि इतर साहित्य घालून चांगले मिक्स करा.
6. आता कढईत तेल टाकून गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा.
7. तेल गरम झाल्यावर त्यात पोह्याचे मिश्रण टाकून पकोड्यासारखे तळून घ्या. कढईत पकोडे ठेवल्यावर उलटे करून सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
8. आता गरमागरम सर्व्ह करा.